४ ऑगस्टला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे, जिल्हा बँकेचे संचालक राजीव येल्टीवार, प्रवीण कासावार, सुनील ढाले, ओम ठाकूर, वासुदेव विधाते, राहुल दांडेकर, हरिदास गुर्जलवार, मंगेश पाचभाई, केशव नाकले, सुरेंद्र गेडाम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कंपनीला झुकावे लागले व तरुणांच्या मागण्या लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. १५ ऑगस्टला २० युवक, सप्टेंबर महिन्यात १० व ऑक्टोबर महिन्यात १० असे तरुण कामावर घेतील व उर्वरित २४८ तरुण टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल, असे तहसीलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी लिहून दिले होते. परंतु एक महिना लोटूनही बीएस इस्पात कोळसा कंपनीकडून एकाही तरुणाला रोजगार न देता एका लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली तरुणांची दिशाभूल करून फसवणूक करीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते करीत आहेत. अखेर सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्त तरुण युवक २२ ऑगस्टला तहसील कार्यालयावर धडकले. आश्वासन पूर्ण करून तरुणांना कंपनीत नोकरी द्या अन्यथा सर्व तरुण आत्मदहन करणार व याला जबाबदार प्रशासन, कंपनी राहणार असा इशारा दिला. यावेळी आझाद उदकवार, सुनील जिनावार, अनुप धगडी, पंढरी धांडे, उमेश पोतराज, श्रीकांत पेटकर, जयंत उदकवार, प्रकाश म्याकलवार, अभय मेश्राम, अंकुश लेनगुळे, प्रतीक गेडाम, गौरव मेश्राम, गणेश उदकवार, कालिदास अरके, शुभम जींनावार, अविभारा सिन्नमवार, नीलेश जाभुळकर, मारोती तुरणकर, नीलेश बेलेकर, रितेश गावडे, बांधूरकर, गजानन वासाडे, अक्षय झाडे आदी उपस्थित होते.
उपोषणकर्त्याची दिशाभूल केल्याचा आरोप, तीन दिवसांचा अल्टिमेटम : तरुणांनी दिला आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:44 AM