गुरुवारी अपघातकिशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गावातील पाणीटंचाईची समस्या सोडवून समाधानाने गावाकडे परतणाºया तरुणांवर काळाने झडप घातली. नेर-कारंजा मार्गावर कोहळा पुनर्वसनजवळ काळरुपी ट्रकने दुचाकीस्वार तिघांनाही गुरुवारी रात्री चिरडले. या तिघांच्या मृत्यूची वार्ता येताच गावात स्मशानशांतता पसरली. शुक्रवारी दुपारी अख्या गावाने या तीन तरुणांना अखेरचा निरोप दिला. तेव्हा आजंतीत आसवांचा आर्त आकांत सुरू होता.अंकुश वसंता जुनघरे (२६), घनश्याम श्रृंगारे (३२) आणि राहुल रमेश काळे (२७) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहे. तालुक्यातील आजंती (खाकी) येथे कायम पाणी टंचाई असते. गावातील ही पाणीटंचाई मिटविण्यासाठी हे तिघेही धडपडत होते. नेर येथे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना पाणीटंचाई विषयावर भेटण्यासाठी हे तिघेही दुचाकीने आलेत. महसूल राज्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी समस्या निकाली काढली. समाधानी चेहºयाने दुचाकीने ते गावाकडे निघाले होते. परंतु कोहळा पुनर्वसन जवळ समोरुन येणाºया आणि एकच लाईट सुरू असलेल्या ट्रकने या तिघांनाही चिरडले. त्यात अंकुश आणि घनश्यामचा जागीच मृत्यू झाला. तर राहूलला उपचारासाठी यवतमाळला नेताना वाटेतच मृत्यू झाला.या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी अपघात स्थळी धाव घेतली. गावची पाणीटंचाई मिटवून येताना अपघात झाल्याने प्रत्येक जण हळहळत होता. शुक्रवारी तिघांचीही उत्तरीय तपासणी करून प्रेत गावात आणले. तेव्हा गावात आकांत झाला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. कुटुंबीयांचा आक्रोश तर हृदय चिरणारा होता. दुपारी या तिघांचीही सामूहिक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत गावातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. प्रत्येक जण हळहळत होता.गावात चूल पेटली नाहीतीन तरुणांच्या अपघाती निधनाने चिमुकले आजंती गाव हादरले. शुक्रवारी कुणाच्याही घरी चूल पेटली नाही. गावाच्या पाणीटंचाईसाठी धडपडणाºया तरुणांचा असा बळी जावा याचीच प्रत्येकाला हळहळ लागली होती. या तिघांपैकी घनश्याम श्रृंगारे विवाहित होता. तो आपल्या कुटुंबाचा शेतीवर उदरनिर्वाह करीत होता. त्याला आठ वर्षाची मुलगी आहे. राहुल काळे हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक होता. अंकुशची स्थितीही तीच आहे. वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता.महसूल राज्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वनपाणीटंचाईचा प्रश्न घेऊन आलेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती या भागाचे आमदार आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी आजंती गाठून तिघांच्याही कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्ययात्रेला माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, भरत मसराम, उमेश गोडे, पंजाबराव शिरभाते यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
तिघांच्या मृत्यूने आजंतीत आसवांचा आर्त आकांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:23 PM
गावातील पाणीटंचाईची समस्या सोडवून समाधानाने गावाकडे परतणाºया तरुणांवर काळाने झडप घातली.
ठळक मुद्देट्रकने दुचाकीला चिरडले : पाणी समस्या मिटवून येत होते गावाकडे, कोहळा पुनर्वसित गावाजवळ