शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

तीन भाविक ठार, ११ गंभीर

By admin | Published: April 09, 2017 12:44 AM

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दोन वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार तर ११ जण जखमी झाले.

दोन वेगवेगळे अपघात : मृत फुलसावंगी आणि जेवलीचे वणी/ पुसद : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दोन वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण ठार तर ११ जण जखमी झाले. वणी-चारगाव मार्गावर झालेल्या कार अपघातात महागाव तालुक्यातील फुलसावंगीचे दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. तर वाशिम जिल्ह्यातील फुलउमरीजवळ झालेल्या आॅटोरिक्षा अपघातात उमरखेड तालुक्यातील जेवली येथील एक तरुण ठार तर सात जण जखमी झाले. महागाव तालुक्यातील सोनवणे परिवार चंद्रपूरच्या महाकाली देवीच्या दर्शनासाठी शनिवारी स्विफ्ट डिझायर कारने (क्र. एमएच २९ आर ५९९९) जात होते. वणी तालुक्यातील चारगाव मार्गावर पेट्रोल भरण्यासाठी समोरच्या ट्रकने अचानक वळण घेतले. त्यामुळे मागाहून जाणारी कार या ट्रक वर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णत: चुराडा झाला. यात किसन धोंडबा गवळी (७०), भगवान उकंडा सोनवणे (६५) दोघेही रा. फुलसावंगी ठार झाले. तर चंद्रकला भगवान सोनोवणे (४५), साक्षी बालाजी कुळसंगे (५), ज्योती अर्जुन सोनवणे (२५) सर्व रा. फुलसावंगी ता. महागाव गंभीर जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार भगवान सोनवणे यांचा फुलसावंगी येथे दुधाचा व्यवसाय होता. आठ दिवसापूर्वीच त्यांचा मुलगा अर्जुन सोनवणे याचे लग्न झाले होते. त्यामुळे सहकुटुंब आपल्या मालकीच्या कारने चंद्रपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन सर्वांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. किसन गवळी यांना मृत घोषित करण्यात आले तर भगवान सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना चंद्रपूर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दुसरा अपघात वाशिम जिल्ह्यातील फुलउमरी गावाजवळ घडला. उमरखेड तालुक्यातील जेवली येथील भाविक आॅटोरिक्षाने (क्र. एमएच २९ डब्ल्यू ९३३८) पाळोदी (ता. मानोरा) येथे मारूतीच्या दर्शनासाठी जात होते. फुलउमरी गावाजवळ आॅटोरिक्षा उलटला. त्यात नंदलाल मानसिंग नोळे (२३) रा. जेवली हा ठार झाला तर गोपाल नोळे, ईश्वर भेलके, शारदा भेलके, सुनीता नोळे, रामेश्वर गवई, सकीयाबाई कटारे, अंकुश जाटवे जखमी झाले. जखमींना तात्काळ पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आॅटोरिक्षा चालक मंगलसिंग तरारे रा. जेवली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (लोकमत चमू) जखमींमध्ये नवदाम्पत्यासह पाच वर्षीय चिमुकली अर्जून सोनवणे याचा विवाह १५ दिवसांपूर्वीच झाला होता. ते पत्नीसह देवीच्या दर्शनासाठी चंद्रपूर येथे जात होते. वणीजवळ कार ट्रकवर आदळल्याने झालेल्या या अपघातात हे नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कार अर्जूनच्या मालकीची असून तोच स्वत: चालवित असल्याची माहिती आहे. या अपघातात त्यांच्यासोबत साक्षी बालाजी कुळसंगे ही पाच वर्षीय बालिकाही जखमी झाली. या अपघाताचे वृत्त फुलसावंगी येथे धडकताच नातेवाईकांनी वणीकडे तर गावातील नागरिकांनी सोनवणे यांच्या घराकडे धाव घेतली.