लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे.दरम्यान, तूर खरेदीला शासनाने १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु खरेदीचे आदेश बाजार समितीला मिळाले नाही. खाली पोते तेवढे पाठविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु केली. त्यासाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. त्यानुसार दारव्हा बाजार समितीकडे तालुक्यातील पाच हजार ८०० शेतकऱ्यांनी तूर खरेदीकरिता आॅनलाईन अर्ज केले होते. खरेदी सुरू झाल्यानंतर तारखेनुसार एक हजार ५३५ एसएमएस पाठविण्यात आले. आतापर्यंत १५ हजार क्विंटल खरेदी झाली. बाजार समितीमध्ये विक्रीकरिता तूर येणे सुरूच होते. तेवढ्यात शासनाने मध्येच खरेदी बंद केली. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून तूर तशीच मार्केट यार्डमध्ये पडून आहे.दुसरीकडे नोंदणी करणारे चार हजार २६५ शेतकऱ्यांना एसएमएससुद्धा पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्ंिवटल तूर असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी शासनातर्फे खरेदीला मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात खरेदीला सुरूवात झाली नाही. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता मुदतवाढ मिळाली असली तरी खरेदी सुरु करण्यासाठी अद्याप कोणतीही सूचना दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच खरेदी सुरू होईल, अशी अपेक्ष व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची नोंदणी पाहता एवढ्या कमी दिवसात शेतकऱ्यांची तूर मोजून कशी घ्यावी, अशी चिंता बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना सतावत आहे, तर याहीपेक्षा वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. मार्केट यार्डमध्ये खुल्या मैदानात माल पडून असल्यामुळे वातावरणाचा फटका बसेल का, चोरी जाईल का याची भीती आहे.त्याच बरोबर घरात तूर पडून असणाऱ्यांना नाफेडने खरेदी केली नाही, तर तूर विकायची कुठे, असा प्रश्न सतावत आहे. तुरीच्या खरेदीमधील गोंधळामुळे अनेकजण अडचणीत सापडले आहे.हातात पैसे केव्हा पडणारमार्चपर्यंत मोजणी झालेल्या शेतकऱ्यांचा हिशेब बाजार समितीकडून पाठविण्यात आला. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना धनादेश मिळाले आहे. आता तूर खरेदीलाच एवढा विलंब होत असताना पैसे केव्हा ुमिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
तीन हजार क्विंटल तूर मार्केटमध्ये पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:26 PM
तूर खरेदी बंद करण्यात आल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून तीन हजार क्विंटल तूर दारव्हा बाजार समितीच्या यार्डमध्ये पडून आहे. चार हजार २६५ शेतकरी एसएमएस प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तत्काळ तूर खरेदीची मागणी आहे.
ठळक मुद्दे४२६५ शेतकरी प्रतीक्षेत : खरेदी मुदतवाढीचा आदेशच नाही