शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

यवतमाळच्या व्यापाऱ्याला १० लाखांनी फसवणाऱ्या तीन ठगांना बिहारमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 12:11 IST

त्या ठगांनी व्यापाऱ्याच्या बॅँक खात्यातून दहा लाख रुपये काढून घेतले व ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्याच्या माध्यमातून ट्रान्सफर करीत काढली.

ठळक मुद्देट्रेडिंगचे इंटरनॅशनल अकाऊंट उघडण्यासाठी दिली लिंक

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याला व्यापारात अधिक नफा कमविण्यासाठी इंटरनॅशनल ट्रेडिंगचे खाते कसे फायदेशीर आहे, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर यामध्ये ५० हजार गुंतवणूक हे खाते उघडावे असे सांगण्यात आले. लिंक डाऊनलोड करताच व्यापाऱ्याच्या खात्यातून दहा लाख रुपये काढून घेतले. हा गुन्हा यवतमाळ अवधूतवाडी पोलिसांनी उघड करीत बिहार आझमनगर येथून तिघांना अटक केली.

असद जफर बॉम्बेवाला यांना इंटरनॅशनल ट्रेड मार्केटिंगमध्ये मोठा नफा कमाविता येतो, असे सांगण्यात आले. हे खाते उघडण्यासाठी ५० हजारांची गुंतवणूक असून, त्याची लिंक युनायटेड किंगडम ऑन व्हॉट्सॲप व्यापाऱ्याला सेंड करण्यात आली. त्यांनी ही लिंक डाऊनलोड करताच काही तासांत त्या ठगांनी व्यापाऱ्याच्या बॅँक खात्यातून दहा लाख रुपये काढून घेतले व ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्याच्या माध्यमातून ट्रान्सफर करीत काढली. जेणेकरून पोलीस तपासांत आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी खेळी या ठगांनी केली. फसवणूक झाल्यावर असद बॉम्बेवाला यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धीरेंद्रसिंग बिलावल यांनी सुरू केला. आरोपी बिहारमधील आझमनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. अवधूतवाडी पोलिसांनी आझमनगर येथे जाऊन मो. जमील मो. अख्तर (रा. रंगापोखर), उपदेश शर्मा (रा. बुधौलमनी), यासीर अरफत (रा. निस्ताशेखपूर) या तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना गुन्ह्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.

थेट बिहारसारख्या राज्यात जाऊन गावखेड्यात दडलेल्या आरोपीचा माग काढण्यात तपास अधिकारी धीरेंद्रसिंह बिलवाल यांना यश आले. आता या आरोपींची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. त्यांच्याकडून देशपातळीवरील फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोरArrestअटकYavatmalयवतमाळ