यवतमाळ - नेर तालूक्यातील विरगव्हान येथे खिचडीत पाल पडल्याने व ती खिचडी खाल्ल्याने तिन मूलीना विषबाधा झाली, यातील एका मूलीचा यवतमाळ शासकीय रूग्नालयात नेतांना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ही घटना रविवारी गाव प्रशाशनाने सकाळी उघडकीस आणली. मृत्यू झालेल्या मूलीला विरगव्हान येथे अत्यसंस्कारासाठी आणले अंसताना पून्हा यवतमाळच्या आरोग्य विभागाने येऊन तिचे प्रेत यवतमाळ हलवून शवविच्छेदन केले.तालूक्यातील विरगव्हान येथील विजय गायकवाड हे मजूरी करतात. यांच्या घरी खिचडी शिजवत होते. यात अनावधाने पाल पडली माञ हा प्रकार लक्षात आला नाही. दरम्यान ही खिचडी त्यांचे चिमूकले मूले खूशी दिव्या व मूलगा चेतनने खाल्ली. दरम्यान त्यांना उलट्या सूरू झाल्याने खिचडी बघितली असता यात पाल आढळली. तीन्ही मूंलाना तातडीने नेर शासकीय रूग्नालयात आणले. प्रकृती खालवल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रूग्नालयात हलवण्यात आले. कोलूरा गावाजवळ यातील खूशी गायकवाड हीचा मृत्यू झाला. दरम्यान दोन्ही मूलावर यवतमाळ शासकीय रूग्नालयात उपचार सुरू आहे, मृत खूशीला विरगव्हान येथे आणले अंसताना आरोग्य विभागाने पून्हा शवविच्छेदन करण्याकरीता नेले. सदर घटनेमूळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खिचडीत पाल पडल्याने तिघांना विषबाधा, एकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 9:45 AM