लोकमत न्यूज नेटवर्कपोफाळी : आईसोबत शेतात गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.ऋतुराज संतोष वाघमारे (३) असे मृत बालकाचे नाव आहे. संतोष वाघमारे यांचे गावानजीकच शेत आहे. या शेतात मनिषा संतोष वाघमारे आपल्या चिमुकल्या ऋतुराज सोबत गेली होती. शेतात असलेला हरभरा खुडण्याचे काम ती करीत होती. त्यावेळी आईची नजर चुकवून ऋतुराज विहिरीकडे गेला. समतल असलेल्या विहिरीत अचानक कोसळला. आईच्या हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरडा केली. परिसरातील शेतकरी धावून आले. ऋतुराजला बाहेर काढले. त्याला उमरखेड येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
तीन वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:31 AM
आईसोबत शेतात गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देपोफाळीची घटना : आईसोबत गेला होता शेतात