शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आपला जीन प्रेसच्या आमसभेत गदारोळ

By admin | Published: September 20, 2015 12:10 AM

स्वमालकीच्या नसलेल्या जागेवर दुकान गाळे बांधण्याच्या प्रकारावर आक्षेप घेत येथील आपला जीन प्रेसच्या सभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.

विरोधकांचा गदारोळ : दुकान गाळ्यांच्या बांधकामावर आक्षेपउमरखेड : स्वमालकीच्या नसलेल्या जागेवर दुकान गाळे बांधण्याच्या प्रकारावर आक्षेप घेत येथील आपला जीन प्रेसच्या सभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे या संस्थेची शनिवारची आमसभा अवघ्या काही मिनिटात गुंडाळली गेली. येथील संजोग भवनात ही सभा बोलाविण्यात आली होती.संस्थेचे अध्यक्ष बालाजी उदावंत हे आमसभेचे अध्यक्ष होते. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, बळवंतराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमीरे, प्रदीपराव देवसरकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे, रमेश चव्हाण, पंचायत समिती उपसभापती विठ्ठलराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, उपसभापती भैयासाहेब नाईक, जीन प्रेसचे उपाध्यक्ष विठ्ठलराव राणे, काशीनाथ पेंधे, शरद पुरी, सूर्यवंशी, डॉ. अजय नरवाडे, रविकांत रूडे, रामराव नरवाडे, डी.डी. जाधव, धनुराव धोपटे, बाबूराव कदम यांची मंचावर उपस्थिती होती. आमसभेच्या सुरुवातीला जीन प्रेसचे व्यवस्थापक जोशी यांनी वार्षिक आर्थिक अहवाल वाचन केले. यानंतर संस्थेचे सभासद विकास चव्हाण आणि भीमराव चंद्रवंशी यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. संस्थेतर्फे बांधण्यात येत असलेले ३८ गाळे याविषयीचा मुद्दा चांगलाच गाजला. बांधकाम होत असलेली जागा आपला जीन प्रेसच्या मालकीची नाही. ही बाब आमसभेत सातबारा दाखवून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, १९ सप्टेंबरचा हा सातबारा होता. १६ सप्टेंबर २०१४ रोजी बनावट सातबारा देऊन फेरफार करून घेतल्याचा आरोपही यावेळी चव्हाण व चंद्रवंशी यांनी केला. आजच्या स्थितीतील सातबारा हा सक्षम पुरावा असल्याने बांधकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी रेटण्यात आली. येथूनच सभेत एकच गदारोळ निर्माण झाला. दुकान गाळे थांबविण्याचा ठराव विलास चव्हाण यांनी मांडला. त्याला भीमराव चंद्रवंशी यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांनीही आवाजी मताने ठरावाला सहमती दर्शविली. एकूणच या सभेत संस्थेच्या हिताच्यादृष्टीने कुठलीही चर्चा झाली नाही. संपूर्ण सभेत गदारोळ झाला. अवघ्या काही वेळेत सभा गुंडाळली. (शहर प्रतिनिधी)