शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

दिग्रसमध्ये गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 10:27 PM

येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.

ठळक मुद्देसंजय राठोड यांची उपस्थिती : शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेनेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पत्रकार व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना तथा महिला आघाडीतर्फे तालुक्यातील दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.गेल्या अनेक वर्षांपासून दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी मल्लीकार्जुन महादेव संस्थान सभागृहात कार्यक्रम झाला. ना.संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्ष सदफजहा मोहम्मद जावेद, पंचायत समिती सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, सुधीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवचरित्र व्याख्याता प्रा.नितीन बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व पालकांची ना.राठोड यांनी विचारपूस करून खूप शिका मोठे व्हा, अशी कौतुकाची थाप दिली.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखेडे, शहर प्रमुख संजय कुकडी, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, आरोग्य सभापती केतन रत्नपारखी, नगरसेवक बाळू जाधव, नगरसेविका वैशाली दुधे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, दिनेश महिंद्रे, जाधव, गावंडे, अजय भोयर, रमाकांत काळे, मिलिंद मानकर, विनायक दुधे, अतुल राठोड, हनुमान रामावत, अक्षय जयस्वाल, युवा सेना शहर प्रमुख आनंद जाधव, दिनेश खाडे, ओम वºहाडे, महेश कदम, यश अवझाडे, स्वप्निल बदुकले, ललित राठोड, शुभम राठोड, महिला आघाडीच्या संजीवनी शेरे आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक अभय इंगळे, संचालन सुरेंद्रा मिश्रा व सुरेश चिरडे यांनी केले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करा - नितीन बानगुडेशिव व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रथम आयुष्याचे ध्येय निश्चित करा, असे सांगितले. ध्येय निश्चित केले की यश हमखास मिळते. मग परिस्थिती गरीब असो की श्रीमंत. यशाच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही. गुणांवरून परीक्षेतील यशापयश ठरत असले, तरी जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय, आत्मविश्वास आणि जगण्याचा दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. नापास झालेल्यांनी आपल्या सुप्त गुणांना ओळखून त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड