लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा, मारेगाव, झरी तालुक्याच्या परिसरात वाघांचा वावर वाढला आहे. यात वाघ-मानव संघर्ष होऊन कोणाही एकाचा जीव जाण्याच्या घटना वाढत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आता वनविभागाच्या यंत्रणेने थेट गावकऱ्यांच्या दारात पोहोचून मार्गदर्शनाचा सपाटा सुरू केला आहे.पांढरकवडा वनविभागांतर्गत रामनगर गावातील वाघ-मानव संघर्षाची घटना ताजी आहे. त्यामुळे जवळपास २० गावांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या भीतीतूनच यापुढे माणसांकडूनही वाघांवर हल्ले होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात माणसांना जंगलात जाण्याविना पर्याय नाही. त्यामुळे वाघ आणि माणूस कधीही एकमेकांच्या पुढे येऊ शकतात. असे झाल्यास एकतर माणूस किंवा वाघ गतप्राण होण्याची भीती आहे.या दोन्ही अप्रिय घटना कशा टाळाव्या याबाबत आता वनविभाग मार्गदर्शन करीत आहे. उपवनसंरक्षक के. एम. अभर्णा यांच्या निर्देशावरून ११ गावांमध्ये या सभा पार पडल्या आहेत. तर आणखी काही गावांमध्ये सभांचे नियोजन सुरू आहे. वाघ आणि माणसाचा सरळ संपर्क कसा टाळावा, जंगलात गुरे चारत असताना, तेंदूपाने गोळा करत असताना, जंगलालगतच्या शेतात काम करीत असताना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याबाबत गावकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. सभांचा सपाटा सतत सुरू असून उर्वरित गावातही सभा होणार आहे.या गावांमध्ये होताहेत सभारामनगर, गौराई, वसंतनगर, वाई, गणेशपूर, शिवनाळा, कोंडी, वेडद, घनमोड सोसायटी, खैरगाव, खैरगाव पोड, माकोडा, दुर्गाडा आदी गावांमध्ये आतापर्यंत सभा पार पडल्या. यात मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी मार्गदर्शन केले. सहायक उपवनसंरक्षक बन्सोड, राउंड आॅफिसर सोनुले, वन्यजीव प्रेमी प्रशांत महाजन, वनरक्षक मस्के, नैताम, जक्कावार, काळे आदींनी प्रत्यक्ष गावकºयांशी संवाद साधला. स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, गुराखी, गावकरी उपस्थित होते.
वाघ-मानव संघर्ष नको, वनयंत्रणा गावकऱ्यांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:00 PM
पांढरकवडा, मारेगाव, झरी तालुक्याच्या परिसरात वाघांचा वावर वाढला आहे. यात वाघ-मानव संघर्ष होऊन कोणाही एकाचा जीव जाण्याच्या घटना वाढत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आता वनविभागाच्या यंत्रणेने थेट गावकऱ्यांच्या दारात पोहोचून मार्गदर्शनाचा सपाटा सुरू केला आहे.
ठळक मुद्दे२० गावे दहशतीत : गावा-गावात जाऊन मार्गदर्शनाचा सपाटा, पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत उपाययोजना