शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

उमर्डा नर्सरी परिसरात वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:03 PM

शहरालगतच्या उमर्डा नर्सरी परिसरात दोन आठवड्यांपूर्वी वाघाचे वास्तव्य असल्याच्या खुणा आढळल्या. वन विभागाने वाघाची विष्ठा व पगमार्कचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.

ठळक मुद्देदहा ट्रॅप कॅमेरे : विष्ठा, पगमार्कचे नमुने घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरालगतच्या उमर्डा नर्सरी परिसरात दोन आठवड्यांपूर्वी वाघाचे वास्तव्य असल्याच्या खुणा आढळल्या. वन विभागाने वाघाची विष्ठा व पगमार्कचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. या परिसरात पगमार्क आढळले, तेथे दहा ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे.उमर्डा नर्सरी पसिरात बिबटाचे अधूनमधून अनेकांना दर्शन झाले. आता या जंगलात वाघ असल्याच्या पाऊल खुणा मिळाल्या आहे. दोन आठवड्यांपूर्वी इचोरी शिवारात काही दिवसांच्या फरकाने तब्बल आठ जनावरांची शिकार झाली. काही जनावरे पूर्ण खालेल्ली, तर काही अर्धवट सोडून दिल्याचे आढळले. स्थानिक वनाअधिकाºयांची याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठांना सूचना दिली. त्यावरून या परिसरात सर्च घेण्यात आला. त्यात जंगलात वाघाची ओली विष्ठा आढळली. काही भागात पगमार्कही आढळले.उमर्डा नर्सरी परिसरात घनदाट जंगल आहे. शिवाय दोन तलाव लागूनच आहेत. त्यामुळे या परिसरात वाघ शिरण्याला दुजोरा मिळत आहे. वन विभागाचे सावध पवित्रा घेत आता ट्रॅप कॅमेरे लावले आहे. वाघाचा २४ तासातील अधिवास हा तब्बल ४० किलोमीटर परिसरात राहतो. त्यामुळे अद्याप वाघाचे नेमके ठिकाण निश्चित झाले नाही. ज्या भागात शिकार झाली, तेथे पगमार्क घेण्यासाठी खास पॅच तयार केले जाणार आहे. या जंगलात पट्टेदार वाघ वास्तव्यास आल्यास यवतमाळकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षावाघाची विष्ठा वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे. पगमार्कही अभ्यासाठी तज्ज्ञांकडे दिले आहेत. त्याचा अहवाल मिळातच उमर्डा नर्सरी परिरात वाघाच्या वास्तव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.