लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टिपेश्वर अभयारण्य विदर्भातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत आहे. तर दुसरीकडे या अभयारण्यातील पट्टेदार वाघ स्वत:च लगतच्या मराठवाडा तसेच तेलंगाणा राज्यात पर्यटनाला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.टिपेश्वर हे देशातील वाघांसाठीचे व इतर वन्यप्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या व महसुलात वाढ झाली आहे. बुधवार १ एप्रिलपासून पांढरकवडा वन्यजीव विभागातील टिपेश्वर अभयारण्याचे नियंत्रण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले आहे. तत्पूर्वी हे नियंत्रण नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे होते. नियंत्रण सोडण्यापूर्वी मंगळवारी पेंचचे क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. रवीकिरण गोवेकर यांनी टिपेश्वरमधील वाघांची सद्यस्थिती स्पष्ट केली. त्यानुसार आजच्या घडीला टिपेश्वर अभयारण्यात तीन प्रौढ नर, पाच प्रौढ मादी, नऊ अवयस्क असे एकूण १७ वाघ आहेत. याशिवाय काही बछडेही आहेत. या अभयारण्यातील दोन अवस्यक वाघांना मार्च २०१९ मध्ये भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्यामार्फत रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. तत्पूर्वी या वाघांना ताराचे लागलेले फास काढण्यात टिपेश्वरच्या वनकर्मचाऱ्यांनी यश मिळविले होते. या दोन पैकी एक वाघ (सी-१) १२ महिन्यात सुमारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून मराठवाड्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थायिक झाला आहे. पहिल्यांदाच वाघाचा प्रवेश हा विदर्भातून मराठवाड्यात झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले तर दुसरा वाघ (सी-३) तेलंगाणा राज्यात भ्रमंतीवर गेला होता. तेथील कावल व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करून तो पुन्हा टिपेश्वरला दाखल झाला. या दोन्ही वाघांच्या प्रवासातून कॉरिडॉरबाबत वन प्रशासनाला बरीच उपयुक्त माहिती प्राप्त झाली आहे. रेडिओ कॉलर लावलेल्या या वाघांचे सनियंत्रण शास्त्रीय पद्धतीने केले जात आहे.बेशुद्धीकरणाचा यंत्रणेला अनुभववाघिणीचे दोन अवयस्क बछडे काटे लागल्याने जखमी झाले होते. त्यांचे सनियंत्रण करून त्यांना नैसर्गिकरीत्या बरे होण्यासाठी जंगलात सोडण्यात आले. त्यातील एकाला बेशुद्ध करून उपचाराअंती पुन्हा निसर्गमुक्त करण्यात आले. अशा चार वाघांना बेशुद्धीकरणाचा अनुभव टिपेश्वरच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना घेता आला. गळ्यात फास अडकलेल्या वाघिणीला अल्पकालावधीसाठी टिपेश्वरला परत आली असता बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती अशक्त असल्याने या कार्यवाही दरम्यान दगावली.व्याघ्र संवर्धनासाठी लॅन्डस्केप मॅनेजमेंटव्याघ्र संवर्धन हे लॅन्डस्केप लेव्हल मॅनेजमेंट या तत्वाचा आधार घेऊन केल्यास यशस्वी ठरते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. त्यातून टिपेश्वर परिसरात पांढरकवडा (प्रादेशिक) विभाग तसेच यवतमाळ वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प संवर्धनाकरिता गेल्या दोन आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.आंतरराज्यीय कॉरिडॉर मॅपिंग प्रशिक्षणलगतच्या तेलंगाणा राज्यातील कावल व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर अभ्यास भेट घडवून आणून मार्गदर्शन करण्यात आले.पांढरकवडा वन्यजीव विभाग, कालव व्याघ्र प्रकल्प, नांदेड विभाग, किनवट वन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदा आंतरराज्यीय कॉरिडॉर मॅपिंगबाबत संयुक्त प्रशिक्षण देण्यात आले.त्यातून वाघांच्या भ्रमण मार्गक्षेत्रामध्ये कॅमेरा ट्रॅप लावून माहिती गोळा केली गेली. यावर्षी कावल व्याघ्र प्रकल्पातील ३० क्षेत्रीय कर्मचाºयांना टिपेश्वरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
टिपेश्वरमधील वाघ मराठवाडा, तेलंगाणात पर्यटनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:00 AM
टिपेश्वर हे देशातील वाघांसाठीचे व इतर वन्यप्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या व महसुलात वाढ झाली आहे. बुधवार १ एप्रिलपासून पांढरकवडा वन्यजीव विभागातील टिपेश्वर अभयारण्याचे नियंत्रण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले आहे. तत्पूर्वी हे नियंत्रण नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे होते.
ठळक मुद्देतीन हजार किमी प्रवास : एक ज्ञानगंगा अभयारण्यात स्थायिक, दुसऱ्याचा कावल व्याघ्र प्रकल्पात फेरफटका