शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

टिपेश्वरला २४ लाख वनविकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:19 PM

पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याला पर्यटन विकासासाठी शासनाने २४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा यासाठी पुढाकार असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देइको टुरिझम : पर्यटन वाढविण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याला पर्यटन विकासासाठी शासनाने २४ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा यासाठी पुढाकार असल्याचे सांगितले जाते.जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ला लागून टिपेश्वर अभयारण्याची हद्द आहे. पांढरकवड्यापासून सुरू होणारे हे अभयारण्य पुढे उमरखेडला पैनगंगा अभयारण्याला मिळते. टिपेश्वर अभयारण्यात दुर्मिळ पशुपक्षांसोबतच पट्टेदार वाघाचेही अस्तित्व आहे. या व्याघ्र दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने टिपेश्वरमध्ये जातात. मात्र तेथे पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याअंतर्गत तेथे मचान, हट, वाहने, गेस्ट हाऊस, कॅन्टींग, रस्ते आदी सोईसुविधांची आवश्यकता आहे. त्याच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाने इको टुरिझम अंतर्गत २४ लाख ६९ हजार रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यातून विकास कामांना सुरुवात होणार आहे. आणखी निधी टिपेश्वरच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.एकीकडे अभयारण्याबाहेर पट्टेदार वाघिणीने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. १४ शेतकरी-शेतमजुरांची शिकार केलेल्या या वाघिणीला जीवंत अथवा मृत पकडण्यासाठी वन विभाग दोन महिन्यांपासून शर्तीचे प्रयत्न करतो आहे. मात्र अद्याप त्यात यश आले नाही. तर दुसरीकडे वाघाला पाहण्यासाठी टिपेश्वरमध्ये गर्दी होते.