अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेरोजगारी, आत्महत्या अशा दु:खांच्या पखाली वाहणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला नाईलाजाने ‘मागास’ असे बिरुद चिकटले. पण या दु:खाच्याही पलिकडे यवतमाळ जिल्ह्याची श्रीमंती दऱ्याखोऱ्या आणि जंगलांमध्ये बहरलेली आहे. शिक्षण, संस्कृती आणि उद्योग हे घटक जसे एखाद्या भूप्रदेशाच्या समृद्धीचे निदर्शक ठरतात, तशीच त्या-त्या भागातील जैवविविधताही या भागाचा महत्वाचा अलंकार असतो. जैवविविधतेचे असे असंख्य दागिने यवतमाळ जिल्ह्याने ल्यायलेले आहे.पांढरकवडा-घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याचा प्रवास रौप्य महोत्सवात पोहोचतोय. येथील १७ वाघांची नोंद शासनाला व्याघ्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी बाध्य करणारी आहे. मात्र वाघांशिवायही या अभयारण्याची वनसंपती, वन्यजीव संपत्ती फार मोठी आहे. तर सुवर्ण महोत्सवात पोहोचलेले उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य म्हणजे वनौषधींचा खजिना ठरला आहे.मात्र या दोन्ही अभयारण्यातील जैवविविधतेला शिकारी आणि वनव्यांनी पोखरुन टाकणे सुरू केले आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांना जागृत करण्याची जबाबदारी वन विभागावर येऊन पडली आहे.व्याघ्र प्रकल्प होणार का?३० एप्रिल १९९७ मध्ये टिपेश्वर अभयारण्य मंजूर झाले. १४८.६२ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात ७ मेच्या प्राणी गणनेत १७ पट्टेदार वाघांची नोंद घेण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांची व्याघ्र प्रकल्पाची मागणी मंजुरीच्या टप्प्यात आहे.टिपेश्वरमध्ये २४३ प्रजातींचे वैविध्यपूर्ण पक्षी, बिबट, अस्वल, हरीण, काळविट, चिंकारा, कोल्हा, लांडगा, रान मांजर, रान कुत्रा, चितळ, सांबर, चौसिंगा, साळींदर, उदमांजर आदी प्राणी सृष्टीही समृद्ध आहे. जगातील सर्वात छोटे फुलपाखरु ग्रास ज्वेल आढळते.पैनगंगा अभयारण्य २७ मे १९७१ रोजी घोषित झाले. ४००.६७ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या अभयारण्यात वाघ, बिबट्या, रानकुत्री या प्राणी जगतासह बेहडा, आवळा, गुळवेल, कदंब, आवळा, मोईन, धामणवेल आदी औषधी वनस्पती आहे.वाघाशिवाय टिपेश्वरमध्ये २४३ प्रजातींचे पक्षी आणि ९७ प्रजातींची फुलपाखरे आहेत. हे शुष्क प्रदेशीय जंगल असल्याने प्रत्येक ऋतू जैवविविधतेला पोषक ठरतो. येथील दऱ्यांखोऱ्यांमुळे जैवविविधतेचा अधिवास समृद्ध झाला. मात्र केवळ फ्लॅगशिप स्पीसीसचा आनंद न घेता संपूर्ण जैवविविधतेचा आस्वाद घ्यावा. त्यातून खरे निसर्ग शिक्षण घडेल. - डॉ. रमझान विराणी, मानद वन्यजीव रक्षकयवतमाळ जिल्ह्यात ३६२ पक्षांच्या नोंदी आहे. तर सापांच्या ४० पेक्षा जास्त प्रजाती आहे. २०० प्रजातींचे कोळी, ६५ प्रजातींचे मासे आढळतात. मात्र जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक लोकांना सामील केले पाहिजे. सभोवतीच्या जीवसृष्टीची नोंदवही प्रत्येकाने ठेवावी.- प्रा. डॉ. प्रवीण जोशी, प्राणीशास्त्र विभाग, अमोलकचंद महाविद्यालय
टिपेश्वर, पैनगंगाचा रौप्य, सुवर्ण महोत्सवी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM
पांढरकवडा-घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याचा प्रवास रौप्य महोत्सवात पोहोचतोय. येथील १७ वाघांची नोंद शासनाला व्याघ्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी बाध्य करणारी आहे. मात्र वाघांशिवायही या अभयारण्याची वनसंपती, वन्यजीव संपत्ती फार मोठी आहे. तर सुवर्ण महोत्सवात पोहोचलेले उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य म्हणजे वनौषधींचा खजिना ठरला आहे.
ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्प होणार का?