लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : ३० मार्च रोजी टिपेश्वर अभयारण्यालाआग लागून १५० हेक्टर भागातील लाखो रूपयांची वनसंपदा व वन्यप्राणी तसेच पशू जळून खाक झाले. तोच पुन्हा सोमवारी या अभयारण्यात दोन ठिकाणी आग लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती व पशुपक्षी आगीच्या भक्षस्थानी पडले. लागोपाठ तीनवेळा लागलेल्या आगीमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने अद्याप कुणावरही कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, या आगी लावण्यात येत असल्याचे वनविभागाचे अधिकारी कबुल करत असले तरी अशावेळी वनांचे सरक्षण करणारे अधिकारी काय करत होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी सायंकाळी या अभयारण्यातील दर्यापूर बिट, गणोरी बिट व भिमकुंड बिटला भीषण आग लागून १५० ते २०० हेक्टरपेक्षा जास्त जंगल जळून खाक झाले. यात वन्यप्राणी व पशुपक्षीही मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. ही आग आटोक्यात येत नाही तोच पुन्हा सोमवारी भिमकुंड बिटमधील कक्ष क्रमांक १२९ व १३१ मध्ये आग लागल्याची माहिती टिपेश्वर अभयारण्यातील कर्मचाऱ्यांना सकाळी १० वाजता मिळाली. ही माहिती मिळताच क्षेत्रीय अधिकारी, विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक आपल्या सहकाºयांसह आग विझविण्याचे साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत १०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र जळून खाक झाले. दुपारी २ वाजेपर्यंत ही आग आटोक्यात येत नाही, तोच पुन्हा दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास गणोरी बिटमधील कक्ष क्रमांक १२६ मध्ये आग लागली. या आगीत ५० ते ६० टक्के वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वन कर्मचाºयांनी २० फायर ब्लोअर मशिनचा वापर करून ही आग नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे टिपेश्वर अभयारण्यातील अधिकाºयांनी वर्तविलेल्या २०० हेक्टर वनक्षेत्रापेक्षा कितीतरी जास्त वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.
टिपेश्वर अभयारण्याला पुन्हा लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:20 PM
३० मार्च रोजी टिपेश्वर अभयारण्याला आग लागून १५० हेक्टर भागातील लाखो रूपयांची वनसंपदा व वन्यप्राणी तसेच पशू जळून खाक झाले. तोच पुन्हा सोमवारी या अभयारण्यात दोन ठिकाणी आग लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती व पशुपक्षी आगीच्या भक्षस्थानी पडले.
ठळक मुद्देलागोपाठ तीन घटना : आगी संशयाच्या भोवऱ्यात, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत