शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

तिवरंग ग्रामस्थांनी केला श्रमदानातून रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 10:40 PM

शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.

ठळक मुद्देगाव करी, ते राव ना करी : शासनाची वाट न बघता श्रमदान, श्रमदानासोबतच हरिकीर्तन

दिनेश चौतमल ।लोकमत न्यूज नेटवर्कमुळावा : शासनाच्या मदतीची वाट न पाहता श्रमदानातून तिवरंग गावकऱ्यांनी रस्ता तयार केला. यातून ‘गाव करी, ते राव ना करी’ ही म्हण त्यांनी सार्थ ठरविली.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तळणी व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तिवरंग गावाला जोडणारा रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांना ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वत: पुढाकार घेत लोकसभागातून पुलाची दुरुस्ती व रस्ता तयार करण्याची संकल्पना मांडली. तिवरंग, मनुला, तळणी, वाकी येथील ग्रामस्थानी होकार देताच कामाला सुरूवात झाली. सध्या पुलाची दुरुस्ती व माती भरावाचे काम पूर्ण झाले. त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. यासोबतच रात्री हरिकीर्तन आयोजित केले आहे. संत मंडळी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी होत आहे. हभप देविदास महाराज, खंडू महाराज, शिंदे माऊली, गणेश महाराज वाकीकर यांचे कीर्तन झाले. हभप गुलाबराव धोंगडे, प्रकाशराव कदम, विश्वनाथ कदम, जगदेवराव महाराज, नामदेव सूर्यवंशी, अनिल कदमल, बाळू महाराज, रमेश महाजन यांनीही कीर्तन केले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबूराव कदम, मारोतराव लोखंडे, विवेक देशमुख यांनी या कामाला भेट दिली. मराठवाड्यातील तळणी रोडला जोडणारा सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता आता जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही सुरूवात झाली. मराठवाड्यातील तळणी, वाकी, साप्ती, कोहळी, निघा, कोळी, निवळा, रुचेगाव, भरडगा, नेवरी या गाातील लोकांना विदर्भातील मुळावा येथे येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. तसेच विदर्भातील तिवरंग, झाडगाव, पिंपळदरी, मुळावा, हातला, धनज, मोहदरी, पिंपळदरी, सुकळी, करमुला, पोफाळी, तरोडा या गावांची मोठी बाजारपेठ असणाºया नांदेड येथे जाण्यासाठी आता सोयीचे झाले आहे.४० किलोमीटरचा फेरा वाचलातिवरंग, मुळावा, उमरखेडमार्गे नांदेड ११० किलोमीटर अंतर जावे लागते. नवीन रस्त्यावरून तिवरंग, तळणी, कोळी, मार्लेगाव मार्गे केवळ ७० किलोमीटर अंतर असल्याने गावकऱ्याचा ४० किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी रस्त्याच्या कामाचे ठिकाणी मुक् कामच ठोकला आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत थांबण्याचा त्यांचा मनोदय आहे. श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले असून परिसरातील गावांमध्ये ग्राम स्वच्छताही केली जात आहे. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.