लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त रविवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळात ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात यवतमाळातील प्रतिथयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील. तसेच सकाळी १० वाजता दर्डा मातोश्री सभागृह येथे प्रख्यात कवी रामदास फुटाणे यांचे ‘भारत कधी-कधी माझा देश आहे’ या विषयावर व्याख्यान होईल. व्याख्यानादरम्यानच कवी भारत दौंडकर आणि अनिल दीक्षित यांची काव्य जुगलबंदीही रंगणार आहे. यवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता इनामी काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून या दंगलीत दहा लाखांच्या बक्षीसांची लयलूट केली जाईल.संगीतमय प्रार्थना सभा : २५ नोव्हेंबर, सकाळी ९ वाजता, प्रेरणास्थळप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे यांचे व्याख्यान सोबत भारत दौंडकर व अनिल दीक्षित यांच्या कवितांची जुगलबंदी : २५ नोव्हेंबर, सकाळी १० वाजता, दर्डा मातोश्री सभागृहइनामी काटा कुस्त्यांची दंगल : २५ नोव्हेंबर, दुपारी १२ वाजता, हनुमान आखाडा
‘प्रेरणास्थळ’ येथे आज संगीतमय प्रार्थना सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 9:32 PM
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त रविवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळात ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देबाबूजींचा स्मृतिदिन : रामदास फुटाणेंचे व्याख्यान