लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील बजार समितीच्या प्रांगणात शेकडो क्विंटल तूर बेवारस पडून आहे. पावसामुळे तूर ओली होत असल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाजार समितीत तूर विक्रीस आणली. मात्र खरेदी बंद झाली. नाफेडतर्फे विदर्भ मार्केटिंगने ५ मेपर्यंत खरेदी केली. तोपर्यंत दोन हजार २७४ शेतकऱ्यांची तीन हजार ४०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यानंतर खरेदी ठप्प पडली. सध्या दीड हजार शेतकऱ्यांची सुमारे दोन हजार क्विंटल तूर बाजार समितीत पडून आहे. आता पावसात ती ओली होत आहे. काही शेतकऱ्यांना बाजार समितीने ताडपत्री पुरविली. मात्र अनेकांची तूर उघड्यावरच आहे.डोळ्यादेखत तूर ओली होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. काही शेतकरी तूर परत नेत आहे. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय बंद केला. तरीही शासन, प्रशासन प्रचंड उदासीन असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
बाजार समितीत तूर बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:23 PM
येथील बजार समितीच्या प्रांगणात शेकडो क्विंटल तूर बेवारस पडून आहे. पावसामुळे तूर ओली होत असल्याने सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ठळक मुद्देआर्णी तालुक्यातील शेतकरी हवालदिल : पावसामुळे फुटली कोंबे