शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पर्यटनाचा मानबिंदू सहस्त्रकुंड उपेक्षितच

By admin | Published: July 22, 2016 2:24 AM

यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला व विदर्भाचा नायगारा समजल्या जाणारा सहस्त्रकुंड धबधब्याचा परिसर ...

समस्या कायम : पर्यटन विभागाचे दुर्लक्षित धोरण, सुविधांची बोंबाबोंब उमरखेड : यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला व विदर्भाचा नायगारा समजल्या जाणारा सहस्त्रकुंड धबधब्याचा परिसर मात्र पर्यटन विकासाअभावी गेल्या ५० वर्षापासून उपेक्षितच राहिला आहे. सहस्त्रकुंड धबधबा जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. धबधब्याचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकृष्ट करतात. धबधब्याचे सौंदर्य डोळ््यात साठवून घेण्यासाठी पावसाळ््यात या ठिकाणी प्रचंड गार्दी असते. मराठवाड्यातील अनेक पर्यटकसुद्धा या ठिकाणी पर्यटणासाठी येत असतात. सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ शासनाच्या उदासिनतेमुळे उपेक्षितच आहे. याठिकाणी कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शसनातर्फे विशेष बसगाड्यांची तथा मुक्कामी राहण्याचीही व्यवस्था नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी पर्यटकांना पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा मिळत नाही. विजेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. सहस्त्रकुंडकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्गदर्शक फलकसुद्घा लावण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविण्यात आलेले नाही. अशाही स्थितीत शेकडो पर्यटक या ठिकाणी रोज गर्दी करून असतात. जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेला हा धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होऊ शकतो. यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न होत आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या भागातील पंजाबराव माने, विठ्ठलराव देवसरकर, पांडुरंग राणे, केश्वराव देवसरकर आदींनी दिल्लीत जाऊन निवेदन ही दिले होते. परंतु हा प्रश्न अद्यापही रेंगाळतच आहे. पर्यटक मात्र येथे आल्यानंतर त्रस्त दिसतात. पैनगंगा अभयारण्यातील नयनरम्य देखावे, शेकडो वर्षापासून नांदत असलेली वैविध्यापूर्ण संस्कृती, घरांची सुबक रचना, नागरिकांचा पेहराव लोककला आदीमुळे या परिसराचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र या बाबीकडे पर्यटन विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अभयारण्य प्रशासनाकडून पर्यटकांसाठी विविध योजना राबविणे गरजेचे असतात. त्या योजना मात्र कागदावरच आहे. या भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पर्यटनाच्या अनुषंगाने व्यवसायाभिमुख पाऊले उचलली तर स्थानिक बेरोजगारांच्या हाताला कामसुद्धा मिळू शकते. मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्याचा मानबिंदू असलेले सहस्त्रकुंड मात्र उपक्षेचा धनी ठरले आहे. यासोबतच या परिसरात पैनगंगा अभयारण्य आहे. अभयारण्यात जंगल सफारी सुरू करण्याची आवश्यकता आहे. यासाठी वन्यजीव विभागाने टिपेश्वर अभयारण्यासारखी व्यवस्था पैनगंगा अभयारण्यात करण्याची गरज आहे. सहस्त्रकुंड सोबतच दुधारी धबधब्याचे वैभवही देखणे आहे. मात्र या धबधब्यापर्यंत पोहोचण्यास पर्यटकांना मोठा अडथळा पार करावा लागतो. तेथे सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी) पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास गर्दी वाढेल सहस्त्रकुंडामुळे विदर्भ व मराठवाड्यातील अनेक पर्यटक पावसाळ््यात येथील गर्दी करतात. या ठिकाणी पर्यटकांना पाहिजे तशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या नियोजन विकास निधीतून दिला गेला तर त्याचा फायदा होईल व पर्यटनस्थळावर खर्च केला तर जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित होतील. आणि या परिसराचा विकास होईल हे तेवढेच खरे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सहस्त्रकुंडला पर्यटनाचा दर्जा मिळावा यासाठी व त्यावर लाखो रुपयांचा निधी खेचून आणण्यासाठी मात्र या विभागाचे लोकप्रतिनिधी कमी पडत आहे. दिल्लीमध्ये चांगले वजन असलेले काँग्रेसचे नेते अ‍ॅड़ राजीव सातव हे या विभागाचे खासदार आहेत. त्याचप्रमाणे उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने हे महाराष्ट्र शासनाच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदार व आमदार या दोघांनी ममनावर घेतले तर सहस्त्रकुंड व पैनगंगा अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास वेळ लागणार नाही.