लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील पहिले कापूस खरेदी केंद्र राळेगावात सुरू झाले. येथे शुभारंभालाच १० हजार क्विंटल कापसाची आवक झाली. विक्रीस आलेला कापूस परतीच्या पावसाने भिजलेला असल्याने तो व्यापाऱ्यांना वाळवत टाकावा लागला आहे. यातून जिनिंग सेंटर हाऊसफुल्ल झाले. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे.राळेगाव बाजार समितीच्या हद्दीत सीसीआयचे तीन कापूस संकलन केंद्र शुक्रवारपासून सुरू झाले. सीसीआयला ८ ते १२ टक्के ओलावा असणारा कापूस लागतो. यामुळे शुभारंभाला आलेला कापूस सीसीआयने खरेदीच केला नाही. व्यापाऱ्यांनी ४८०० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली. हा कापूस ओलाचिंब आहे.या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवली आहे. बाजार समितीनेही त्याबाबत घोषणा केली आहे.प्रतीक्षा शासकीय खरेदीचीखुल्या बाजारात कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत शासकीय खरेदी केंद्र उघडले तर शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबणार आहे. खेडा खरेदीलाही मोठा हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी शासकीय खरेदी केंद्र कधी उघडणार, याची वाट पाहात आहेत.कापूस उत्पादकांची कोंडीजिल्ह्यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे. कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात केंद्र शासनाने कापसाची आयात केली. यामुळे कापसाचे दर पडले आहेत. या स्थितीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यातून कापसाचे दर आणखी घसरले आहे.प्रथमच निर्माण झाली विदारक स्थितीपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या स्थितीत ओलाचिंब कापूस बाजारात आला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अवस्था पाहता या कापसाची खरेदी केली आहे. कापूस खरेदीत प्रथमच अशी विदारक अवस्था पहायला मिळाली. यातून बाजार जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसाच्या गंज्या न लागता वाळवत ठेवल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.सरकारच नाही तर केंद्र उघडणार कोण?सध्या राज्यात काळजीवाहू सरकार आहे. अशा सरकारला निर्णय घेताना मर्यादा पडतात. यामुळे शासकीय कापूस संकलन केंद्र उघडणार किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. यामुळे कापूस विक्रीकरिता शेतकऱ्यांना सध्या तरी खासगी व्यापाऱ्यांच्याच खरेदीवर अवलंबून राहावे लागणार आहे. हा पेच सोडविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
व्यापाऱ्यांचा कापूस वाळतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:00 AM
या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. हा संपूर्ण कापूस वाळवून नंतर त्याचे जिनिंग होणार आहे. या प्रक्रियेला आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे.
ठळक मुद्दे१० हजार क्विंटल । परतीच्या पावसाने भिजला, राळेगावातील जिनिंग-प्रेसिंग फुल्ल