सर सलामत तो पगडी पचास ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच डोक्याला सुरक्षित ठेवणारे वाहतूक नियम मात्र प्रत्येकालाच जाच वाटतात. आज वाहन चालवितानाच्या किरकोळ चुकांमुळे अपघातासारखी ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. देशात सव्वालाखापेक्षा अधिक मृत्यू अपघातात होतो असा अहवाल आहे. हा केवळ वाहतूक नियमांबाबत प्रत्येकाच्या मनात असलेला नकारात्मक भाव आहे. यातूनच ही समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक नियम आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाळल्यास रस्त्यावर सहज आणि सुरक्षितरित्या वावरू शकतो. अगदीच छोट्याछोट्या नियमांना दैनंदिन आचरणात आणल्यास मोठे अपघात सहज टाळता येऊ शकतात. वाहतुकीचे कायदे आपली सुरक्षा राखण्यासाठी आहे हे प्रत्येकाने समजून कृतीत उतरवणे गरजेचे आहे. कुठल्याही कायद्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो हे बघून त्याचे आचरण केल्यास तो जाच वाटत नाही. प्रत्येकाने नियम पाळून आपल्या जीवनातील गोडवा कायम ठेवावा. रस्ता वाहतुकीचा असो की आयुष्याचा, वाटचाल शिस्तीने आणि संयमाने केली तर अपघात घडणारच कसे?- राजेंद्र वाढोकरउपप्रादेशिक परिवहनअधिकारीराग येणे, चिडचिड यामुळे मनावर, शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यातून सामाजिक सलोखा बिघडून नकारात्मक वातावरण पसरते. त्यामुळे संक्रांतीनिमित्त का होईना ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम ‘लोकमत’ राबवित आहे. त्यात मान्यवरांच्या सकारात्मक विचारांचा सिंहाचा वाटा आहे.
वाहतूक नियम जाच नसून सुरक्षेची हमी आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 9:39 PM
सर सलामत तो पगडी पचास ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच डोक्याला सुरक्षित ठेवणारे वाहतूक नियम मात्र प्रत्येकालाच जाच वाटतात. आज वाहन चालवितानाच्या किरकोळ चुकांमुळे अपघातासारखी ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. देशात सव्वालाखापेक्षा अधिक मृत्यू अपघातात होतो असा अहवाल आहे.
ठळक मुद्देडेप्युटी आरटीओ राजेंद्र वाढोकर म्हणतात