शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

वाहतूक शाखेतील दंडाच्या रकमेत अपहाराचा संशय

By admin | Published: February 25, 2015 2:16 AM

जिल्हा वाहतूक शाखेत वाहनधारकांकडून वसूल होणाऱ्या रकमेपैकी अर्धीच रक्कम रेकॉर्डवर दाखवून उर्वरित रकमेचा अपहार होत असल्याचा संशय आहे.

यवतमाळ : जिल्हा वाहतूक शाखेत वाहनधारकांकडून वसूल होणाऱ्या रकमेपैकी अर्धीच रक्कम रेकॉर्डवर दाखवून उर्वरित रकमेचा अपहार होत असल्याचा संशय आहे. कारण रक्कम घेऊनही ती चलानवर नमूद न करता चक्क वाहनधारकांना कोरे चलान दिले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. घाटंजी तालुक्याच्या सायखेडा येथील विलास महादेव भुरके (५५) हे शेतकरी आपल्या एम.एच.२९-एओ-१८८७ या पॅशन प्रो गाडीने सोमवारी २३ फेब्रुवारीला यवतमाळात आले होते. गोदनी रोडवर जात असताना जाजू चौकात एका वाहतूक पोलीस शिपायाने त्यांना अडविले. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. मात्र आरसी बूक सोबत नव्हते. म्हणून त्यांच्याकडून २०० रुपये घेतले व चलानही दिले.मात्र या रकमेची चलानवर नोंदच नव्हती. अखेर हे कोरे चलान घेऊन (रक्कम नमूद नसलेले) भुरके यांनी एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत ‘लोकमत’ कार्यालय गाठले. हे चलान पाहून धक्काच बसला. २०० रुपये घेऊन प्रत्यक्षात त्यातील १०० रुपयेच रेकॉर्डवर नमूद केले जात असावे, उर्वरित १०० रुपयांचा सदर वाहतूक पोलीस शिपायाने अपहार केला असावा, असा संशय या सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात वाहतूक शाखेचे १६४ पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण, वाहनांच्या तपासणीसाठी दरदिवशी तैनात असतात. एका दिवशी ते डझनावर वाहनांचे चलान फाडतात. तसे टार्गेटच त्यांना दिले जाते. वाहनधारकांना चलान दिले जाते मात्र या सर्व प्रकरणात अर्धीच रक्कम रेकॉर्डवर दाखवून उर्वरित रक्कम हडपली जात असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. एक तर वाहतूक पोलीस अर्ध्या अधिक वाहनांना चलान देत नाही, चिरीमिरी करून वाहने सोडली जातात. आता तर चक्क चलानवर रक्कम नमूद न करता कोरे चलान वाहनधारकांना देण्याचे धक्कादायक प्रकारही पुढे आले आहे. चलान न देता आणि चलान देऊन त्यातील अर्धी रक्कम हडपणे अशा दोन प्रकारातून जिल्हा वाहतूक पोलीस शाखेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गोंधळ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘लोकमत’च्या हाती लागलेले कोरे चलान हा एक सबळ पुरावा आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चलान बुकांचे स्पेशल आॅडिट केल्यास तेथील मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)