पोलिसांचे दुर्लक्ष : दिग्रस ते अनंतपूर मार्गावरील पैनगंगा नदीवरील पूल ठरला लाभदायकपाटण : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातला लागूनच असलेल्या दिग्रस ते अनंतपूर या महाराष्ट्र व आंध्र प्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्यीय पुलावरून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत आहे.दिग्रस-अनंतपूर मार्गावरील पैनगंगा नदीवरील पूल हा आंतरराज्यीय पूल आहे. पाटणबोरीपासून हा पूल अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर आहे. या मार्गाने गेल्यास कोणत्याच प्रकारचा टोल व चौकशीची भानगड नसते. त्यानंतर २५ किलोमीटरचे अंतर पार केले, की पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर परत येता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मार्गाकडे महाराष्ट्र व आंध्रप्रदेश, या दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असून धान्याचीसुद्धा तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. याबाबत ग्रामस्थांना विचारले असता, रात्र झाली की मोठ्या प्रमाणात ट्रक व इतर मोठ्या वाहनांची वर्दळ असल्याचे त्यांनी सांगितले. या पुलाजवळ कोणत्याच प्रकारचा चौकशी नाका नसल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी केली जात आहे. याच मार्गाने विदेशी दारू आंध्रप्रदेशात स्वस्त असल्याने त्याची आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात तस्करी केली जात आहे. या मार्गाकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने वाहनांना बिनधास्त प्रवेश मिळतो. परिणामी तस्कारांनी या भागाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. (वार्ताहर)
आंध्र प्रदेशात जनावरांची तस्करी
By admin | Published: October 16, 2015 2:17 AM