लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी ते घोन्सा मार्गावरील रासा येथे असलेल्या श्रीराम गोरक्षणमधून मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी जनावरांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी या गोरक्षणात काम करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती सापडला नाही. त्याने अटकपूर्व जामीन मिळविल्याची चर्चा असली तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. वरोरा पोलिसदेखिल याविषयात काही बोलायला तयार नाही.मुळचा वणी येथील रहिवासी असलेला नरेश निकम हा पूर्वी वीज कंत्राटदार होता. पुढे त्याने शक्कल लढवून वणी-घोन्सा मार्गावरील रासा गावालगत श्रीराम गोरक्षण या नावाने संस्था सुरू केली. बेवारस जनावरांची सेवा हा या संस्थेचा उद्देश होता. मात्र पुढे या उद्देशालाच हरताळ फासण्यात आला. या संस्थेच्या कार्यकारिणीत काही सामाजिक कार्यकर्त्यांना घेण्यात आले होते. मात्र या संस्थेत चालणाऱ्या गैरकारभाराची कुणकुण लागताच या सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपापल्या पदाचे राजीनामे निकमकडे दिले. मात्र त्याने ते राजीनामे धर्मदाय आयुक्ताकडे सादर केले की नाही, हा संशोधनाचा विषय आहे.२१ जानेवारीच्या पहाटे वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे जनावराने भरलेल्या एका टाटा पीक-अपने प्रकाश मेश्राम नामक वाहतूक पोलिसाला चिरडले. या घटनेनंतर रासा येथील श्रीराम गोरक्षण संस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी इम्तीयाज अहेमद फय्याज आणि मोहम्मद कुरेशी या दोघांना घटनास्थळावरून, तर मोहम्मद फहीम शेख व अदिल खान या दोघांना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून ताब्यात घेतले.या आरोपींनी तपासादरम्यान सदर जनावरे रासा येथील नरेश निकम यांच्या संस्थेतील असल्याचे सांगून त्यांनीच ही जनावरे तस्करीसाठी दिल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. त्यानंतर वरोरा पोलिसांनी श्रीराम गोरक्षणात काम करणाऱ्या अतुल गौरकार व पवन उरकुंडे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणात अटक होणार, या भितीने संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतल्याचे सांगण्यात येते.नरेश निकम करीत होता पायलटिंग२० जानेवारीच्या रात्री श्रीराम गोरक्षणातून वाहनांमध्ये जनावरे कोंबल्यानंतर या वाहनांना सुरक्षित जिल्हा पार करण्याची जबाबदारी स्वत: नरेश निकम याने घेतली होती. जनावरांना घेऊन ही वाहने वरोराकडे निघाल्यानंतर पुढे जाऊन या वाहनांची पायलटींग स्वत: नरेश निकम करत होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र खांबाडा येथे सदर वाहनाने वाहतूक पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर नरेश निकम तेथून पळून गेला, अशीही माहिती मिळाली आहे.
गोरक्षणाच्या नावाखाली जनावरांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:46 PM
वणी ते घोन्सा मार्गावरील रासा येथे असलेल्या श्रीराम गोरक्षणमधून मोठ्या प्रमाणावर कत्तलीसाठी जनावरांची विक्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा पोलिसांनी या गोरक्षणात काम करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशी करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची चौकशी : अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता