लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लालपरी, हिरकणी, एशियाड या व इतर बसवर हात साफ असतानाही चालकांना शिवशाही बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. का तर, ही बस वेगळ्या धाटणीतली आहे म्हणून. शिवशाही चालविण्यात एक्सपर्ट म्हणून या चालकांची नोंदही झाली. आता या प्रशिक्षित चालकांना शिवशाहीच्या स्टेअरिंगवर बसण्याचे वावडे आहे. अशावेळी अप्रशिक्षित चालकांच्या हाती स्टेअरिंग दिले जात आहे. प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा प्रकार अधिकारीही मुकाट्याने सहन करत आहे.यवतमाळ आगारातील ४१ चालकांचे ६ दिवसाचे विभागीय प्रशिक्षण आणि तीन चालकांचे पुणे (भोसरी) येथे प्रशिक्षण झाले आहे. ४४ प्रशिक्षित चालक यवतमाळ आगारात तयार झाले. अमरावती, नागपूर यासह इतर ठिकाणी शिवशाही बस सोडण्यासाठी याच चालकांच्या भरवशावर नियोजन करण्यात आले. परंतु वाहतूक निरीक्षकाची कृपा असल्याने बहुतांश चालकांनी शिवशाहीची साथ सोडली. त्याच त्या आठ-दहा चालकांच्या भरवशावर शिवशाही मार्गावर सोडली जाते. अनेकदा अप्रशिक्षित चालकांच्या हाती शिवशाही बस दिली जाते. आगारात ४४ प्रशिक्षित चालक उपलब्ध असताना शिवशाही बसचे परिपूर्ण ज्ञान नसलेल्या अप्रशिक्षित चालकांना शिवशाही वर पाठविले जाते. काही महिन्यांपूर्वी अप्रशिक्षित चालकांकडून आणि नियमित शिवशाहीवर जाणाºया चालकांकडून आगार व्यवस्थापक ते व्यवस्थापकीय संचालक यांच्यापर्यत तक्रार देण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.यवतमाळ बसस्थानकावरून सुटणाºया शिवशाही 'विना वाहक-विना थांबा' आहे. बसची लांबी अधिक व सोबत वाहक नसल्याने तसेच बहुतांश बसमधील रिव्हर्स कॅमेरे बंद असल्याने बस फलाटावर लावताना चालकाला खूप कसरत करावी लागते. अशावेळी फलाटावर शिवशाही बस लावताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फलाटावर वाहतूक नियंत्रकाची पूर्णवेळ कामगिरी आवश्यक आहे.तांत्रिक बिघाड वाढलेअधिक वजन असल्याने शिवशाही बसला अत्याधुनिक ब्रेक दिलेले आहे. बहुतांश बसचे रिटायडर ब्रेक निकामी झालेले आहे. रिव्हर्स कॅमेरे, डिजिटल रुट बोर्ड बंद आहे. काही बसचे गेट निकामी आहे. त्यामुळे कामगिरी दरम्यान चालकाला हे कर्तव्यही पार पाडावे लागते. याबाबत वारंवार रिपोर्टची नोंद करुनसुद्धा बिघाड दुरुस्त होत नाही.
प्रशिक्षित चालकांना शिवशाही बसचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 9:25 PM
लालपरी, हिरकणी, एशियाड या व इतर बसवर हात साफ असतानाही चालकांना शिवशाही बस चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. का तर, ही बस वेगळ्या धाटणीतली आहे म्हणून. शिवशाही चालविण्यात एक्सपर्ट म्हणून या चालकांची नोंदही झाली. आता या प्रशिक्षित चालकांना शिवशाहीच्या स्टेअरिंगवर बसण्याचे वावडे आहे.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांची मर्जी : अप्रशिक्षितांच्या हाती स्टेअरिंग, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, वरिष्ठांकडे दाखल तक्रारी दुर्लक्षित