शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

निवडणुकीत शेतापर्यंत येतात गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 10:43 PM

पाच वर्ष जनता कोणत्या अवस्थेत आहे याचे कोणत्याच राजकारण्याला सोयरसूतक नसते. परंतु निवडणुका आल्या की, मतांसाठी ही मंडळी घरापर्यंतच नव्हे तर शेतापर्यंत येऊन मतदानाला नेतात, अशी खंत महिलांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजागतिक महिला दिन विशेष : मोलमजुरी करणाऱ्या महिलांची खंत, समन्वयाचे काम पुरुषांकडे

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाच वर्ष जनता कोणत्या अवस्थेत आहे याचे कोणत्याच राजकारण्याला सोयरसूतक नसते. परंतु निवडणुका आल्या की, मतांसाठी ही मंडळी घरापर्यंतच नव्हे तर शेतापर्यंत येऊन मतदानाला नेतात, अशी खंत महिलांनी व्यक्त केली. शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने सदर प्रतिनिधीने काही ग्रामीण महिलांशी संवाद साधला असता मतांच्या राजकारणाचे वेगळेच चित्र पुढे आले.मतंय द्यावं नाई वाटत गा!आमच्या गावातंच का कोन्याबी गावात ह्येच चालू हाये. पाच वर्सं आमी काय मोलमजुऱ्या करतो, कोनाले कायी घेनं देनं राह्यत नाई. पण विलेक्शन आलं तं घरापतूर का वावरावरी गाड्या घेऊन येते लोकं. कसंई कर पण मत्दानाले ये म्हून पाया पडते. माहावालं नाई मनत पण बाकीच्या बायायचं सांगतो. कोणी यॅटो करून नेलं का बाया नरमते, थो मनन त्याचंच बटन मारते... रुक्मा विठ्ठल कारसरपे ही वृद्धा खेड्यातल्या व्होटींगची खरी कहाणी सांगत होती. तळेगाव वाकी या आपल्या गावाविषयी ती म्हणते, येका येका घरी चार चार संडास देल्ले नं एखांद्या घरी येकबी नाई देत. आसे हे राजकारणी हायेतं. इलेक्शनच्या राती गावात कोणी तरी येते, मेन मानूस पाहून पैशाची पेटी देऊन जाते. थो काय करते तं पैसा सोताच ठेवून घेते. नं आमच्या दाठ्ठ्यात हात जोडत येते, अमक्यालेच मतं द्या म्हून सांगते. हे सबन पाह्यलं मतंय द्यावं नाई वाटत गा. मी म्हणतो का तुमी जाण्या-येण्याचे, फराळपाण्याचे ठेवून घ्या. लोकायले कायले वाट्टा भिकाºयावानी? पैसे बी तुमीच घ्या आन तुमीच उभे राहा, तुमीच मतं टाका... तळेगावच्या रुक्माबाईचा हा तळतळाट म्हणजे महिलांच्या मतांच्या अपहरणाचे जिवंत उदाहरण.बचतगटांचा गठ्ठाग्रामीण भागात महिला बचतगटांमुळे महिला संघटित झाल्या खऱ्या. पण त्यांच्या समन्वयाचे काम एखाद्या पुरुषाकडे आहे. निवडणुकीच्या वेळी हा पुरुषच गटाच्या सर्व महिलांची मते आपल्या मतानुसार वळवितो. त्यावरच चिचगावच्या (ता. नेर) नलू ठाकरे बोट ठेवतात. नलू ठाकरे म्हणाल्या, ‘गटाच्या बायायले पह्यलेच सांगून राह्यते कोनाले मत टाकाचं थे. आता आमी बाया दारुबंदीत हावो. गावात दारूबंदी केली. कुठंबी मोर्चा राहो, मी माह्या पैशानं जातो. आमाले समजते मत कोनाले द्याचं थे. पण येकांद्यानं का यॅटो आनला, का लई जनीचे मतं पलट्टे.’पेणाऱ्याले दारू, घेणाऱ्याले पैसे भेट्टेघारेफळच्या (ता.नेर) शशिकला राऊत म्हणाल्या, पैसेवाल्याले पैसेवाला इचारते. मद्दानाच्या टाईमले गावात पेणाऱ्यायले दारू भेट्टे, घेणाऱ्याले पैसे भेट्टे. खेड्यायनं आशी परंपरास चाल्ली हाये. बायायले थे काईच नाई पायजे. घेणारा माणूस पैसे खावून घेते नं मंग आमच्या बायायले सांगते तमक्याले अजिबात मत द्याचं नाई का ढमक्याचं काम बराबर नाई. येकडाव इलेक्शन झालं का मंग कारं कुत्रं इचारत नाई. कवा कवा वाट्टे मताले जाचं तरी कायले? पन आपल्याले अधिकार देल्ला हाय तं जा लागते.गरिबायचं चालते तरी का?चिकणी डोमगा या गावातील अंजनाबाई कोंडबाजी ठाकरे म्हणाल्या, ‘गावात निवडणूक कोणतीय राहो, आमाले पयले आडर राह्यते... फलाना कामाचा हाये, त्यालेच टाकजो मत. जवा मतदानाचा दिस येते तवा आमच्यासाठी यॅटो येते, जिपगाडी येते नाईस काई आलं तं कोनाचं ना कोनाचं खासर जुतून येते. कसंयी करून आमाले मताले नेते. कोनी नेते म्हून आमी जातो. पन तिथीसा गेल्यावर आमी काय करतो हे कोनाले सांगून का कराचं हाये?’पुरुषी मताचे मूल्य वाढले, महिलांचे मत शून्यराज्यघटनेने महिला आणि पुरुष या दोघांच्याही मताला सारखे मूल्य दिले आहे. पण आज प्रत्यक्षात महिलांच्या मताचे मूल्य शून्य केले जात आहे. घरातला पुरुष महिलांच्या मतांवर प्रभाव टाकतो. घरातली आई, बहीण, बायको या तिघींच्या हाताने पुरुषच मतदान करतो. पुरुष मतदान यंत्रात टाकतो, ते त्याचेच मत असते. पण अनेक महिला आपले म्हणून पुरुषाचे मत दान करते. त्यामुळे खेड्यातल्या एकेका पुरुषाच्या मताचे मूल्य दोन-तीन झाले आहे. तर महिलांच्या मताचे मूल्य शून्य होत आहे. मतदान यंत्राला फक्त दाबलेली बटन कळते. बटन दाबणाऱ्याच्या मनातले कळत नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक