शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

यवतमाळ शहरातील कचराकोंडी कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 9:11 PM

शहरातील कचराकोंडी कायम असून या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या शशीमोहन नंदा यांनी प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावरगड येथे पोहाचले.

ठळक मुद्देसावरगड ग्रामस्थांचा विरोध । प्रशासनाची शिष्टाई फसली, घंटागाड्या केल्या परत, नगरसेवकाचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील कचराकोंडी कायम असून या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या शशीमोहन नंदा यांनी प्रयत्न केले. त्यांना अपयश आल्यानंतर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावरगड येथे पोहाचले. मात्र ग्रामस्थांचा कचराडेपोत कचरा टाकण्याला विरोध कायम होता. त्यामुळे कचऱ्याने भरलेल्या घंटागाड्या तशाच परत आणाव्या लागल्या. शिवसेना नगरसेवकांनी कचरा भरलेल्या घंटागाड्या पालिका कार्यालयासमोर उभ्या केल्या आहेत. यावर तोडगा कसा काढायचा, हा प्रश्न प्रशासनापुढे आहे.यवतमाळ नगरपरिषदेचा संपूर्ण कारभार ढेपाळला आहे. येथील राजकीय पुढाऱ्यांच्या भूमिकेमुळे अनेक समस्या उभ्या ठाकत आहे. सावरगड कचराडेपोचा प्रश्न हा अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक चिघळत ठेवण्यात आला आहे. तेथील ग्रामस्थांचा विरोध कायम असूनही पर्यायी जागा शोधण्यात आली नाही. कचराडेपोच नसल्याने शहरात गोळा केलेला कचरा ठिकठिकाणी तुंबला आहे. पावसामुळे या कचºयातून उग्र वास येत आहे. ही समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी घेऊन शिवसेना गटनेते गजानन इंगोले यांनी आंदोलन सुरू केले. शहरात साथरोग पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली. प्रभारी मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी पदभार घेताच पहिल्या दिवशी सावरगड येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याने उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार शैलेश काळे यांनीदेखील तेथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र कचराडेपोमुळे संपूर्ण गावात रोगराई फैलावते, यापूर्वीसुद्धा नगरपरिषदेकडे तक्रार करून येथील कचºयावर योग्य प्रक्रिया केली जात नाही. हा कचराडोपो आमच्या जीवावर उठल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अधिकाºयांना डॉक्टरकडे उपचार घेत असलेल्या चिठ्ठ्याच दाखविल्या. त्यानंतरही तांगडे यांनी किमान १५ दिवस तरी कचरा टाकू द्या, असा प्रस्ताव ठेवला. त्यालाही ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. शेवटी नाईलाजास्तव कचºयाने भरलेल्या घंटगाड्या परत आणाव्या लागल्या. नगरपरिषदेसमोर गटनेते गजानन इंगोले, नगरसेवक गणेश धवणे, नितीन बांगर, अनिल यादव, नीलेश बेलोकार, काँग्रेस नगरसेवक विशाल पावडे, छोटू सवाई आदी उपस्थित होते. यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला.पालकमंत्र्यांनी केली ग्रामस्थांशी चर्चापालकमंत्री मदन येरावार यांनीही सावरगड ग्रामस्थांसोबत चर्चा केली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही बैठक झाली. त्यामध्येही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात येते.नगरपरिषद प्रशासनाच्या चुकीने ही समस्या निर्माण झाली आहे. पूर्वीही कचºयावर योग्या प्रक्रिया केल्या गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ विरोध करत आहे. शेवटी आमच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.- सुहास सरगर, उपसरपंच सावरगडयवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संवेदनशील विषयावर कोणीच तोडगा काढण्यास तयार नाही. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. कचराकोंडी दूर होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार.- गजानन इंगोले,गटनेते (शिवसेना) नगरपरिषद