लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळीचे निमित्त साधून घरोघरी स्वच्छता केली जाते, जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी असे मानले जाते. परंतु यवतमाळ नगरपरिषदेचा नेमका याच्या उफराटा कारभार यंदाच्या दिवाळीत पहायला मिळाला. यवतमाळ शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग आढळून आले. नागरिकांनी विनवण्या करूनही हे ढिग हटविले गेले नाही. आजही हे ढिग कायम आहेत.नगरपरिषदेचे आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांच्याकडून नेहमीच आपल्या कामाचा डांगोरा पिटला जातो. छुटपुट आंदोलनेही खास माध्यमांचे प्रतिनिधी आल्यानंतरच सुरू केले जातात. त्यासाठी माध्यमांना आवर्जुन बोलविले जाते. यावरून सभापतींची चमकोगिरी शहरवासीयांच्या निदर्शनास येते. मात्र याच सभापतींची ‘कर्तव्यदक्षता व कार्यतत्परता’ यंदाच्या दिवाळीत उघडी पडली. नागरिकांनी आपल्या घरात स्वच्छता केली असली तरी रस्त्यावर मात्र अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचल्याचे चित्र शहराच्या विविध भागात पहायला मिळाले. दिवाळीपूर्वी, किमान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी कचऱ्याचे हे ढिग उचलले जावे, अशी विनवणी नागरिकांनी वारंवार दूरध्वनीवरून नगरपरिषदेच्या यंत्रणेकडे केली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने थेट आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांना साकडे घातले गेले. मात्र त्यानंतरही कचऱ्याचे ढिग उचलले गेले नाही. घरात लक्ष्मीपूजन आणि घरासमोर कचरा असे एकूणच चित्र शहरात विविध ठिकाणी दिसून आले. यावरून नगरपरिषद प्रशासन, आरोग्य सभापती व आरोग्य अधिकाऱ्यांची आपल्या अधिनस्त यंत्रणेवर किती पकड आहे, हे स्पष्ट होते.अनेक वर्षानंतर पहिल्यांदा दिवाळीत रस्त्यावर कचऱ्याचे ढिग पहावे लागल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली गेली. दिवाळीनंतरही हे ढिग कायम असल्याने यवतमाळ नगरपरिषदेत खरोखरच जनतेच्या हिताची कामे होतात का ?, प्रशासन व पदाधिकारी कर्तव्यदक्ष आहेत का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले आहे.दिवाळीत आढळलेले कचऱ्याचे हे ढिगारे नगरपरिषदेचे तमाम पदाधिकारी व प्रशासनासाठी आत्मचिंतन करायला लावणारे ठरले आहे.राजकारणात मशगूलनगरपरिषदेचे पदाधिकारी विकासाऐवजी गटबाजी व राजकारणातच मशगूल असल्याचे चित्र आहे. शिवसेना विरुद्ध भाजपा व नगराध्यक्ष विरुद्ध अन्य पदाधिकारी असा सामना नेहमीच पहायला मिळतो. नगराध्यक्षांना अंधारात ठेऊन परस्पर निर्णय घेतले जात आहे. ऐन दिवाळीत शहरात रहिवासी एरियात पहावे लागलेले कचºयाचे ढिगारे त्याचाच परिणाम मानला जात आहे.
यवतमाळ शहरात ऐन दिवाळीत कचऱ्याचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 9:34 PM
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दिवाळीचे निमित्त साधून घरोघरी स्वच्छता केली जाते, जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी असे मानले जाते. ...
ठळक मुद्देनगर परिषदेची स्वच्छता मोहीम : आरोग्य सभापती व प्रशासन साफसफाईत फेल