लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या फ्री मेथॉडिस्ट स्कूलच्या प्रवेशद्वारालगत असलेला महाकाय बिहाडा वृक्ष शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या वृक्षाखाली कार, दोन आॅटोरिक्षा आणि दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. शाळा सुटण्याच्या १५ मिनिटापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.फ्री मेथॉडिस्ट शाळा दुपारी १.१५ वाजता नियमित सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आॅटोरिक्षा चालक आणि काही पालक आपल्या वाहनांनी आले होते. सर्वांनी आपली वाहने उभी करून ठेवली होती. १ वाजताच्या सुमारास अचानक बिहाड्याचा मोठा वृक्ष उन्मळून पडला. रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन आॅटोरिक्षा यात चुराडा झाले. तसेच रस्त्यावरून जाणारे दोन दुचाकीस्वारही या झाडाखाली सापडले. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या कारवरही या वृक्षाच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने कारमध्ये बसून असलेल्या दाम्पत्याला कोणतीही इजा झाली नाही. आॅटोरिक्षा चालक सचिन खंडारे व दत्ता मिरासे यांच्या आॅटोरिक्षाचे मात्र मोठे नुकसान झाले. बघ्यांची गर्दी झाली होती. नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड उचलण्याची कारवाई सुरू केली होती.
शाळेसमोरील झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 9:43 PM
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या फ्री मेथॉडिस्ट स्कूलच्या प्रवेशद्वारालगत असलेला महाकाय बिहाडा वृक्ष शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या वृक्षाखाली कार, दोन आॅटोरिक्षा आणि दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. शाळा सुटण्याच्या १५ मिनिटापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली ...
ठळक मुद्देअवघ्या १५ मिनिटांनी अनर्थ टळलाफ्री मेथॉडिस्टसमोर दुपारी १ वाजताची घटना कार, दोन आॅटोरिक्षा आणि दुचाकीचा चुराडा