ढाणकी : मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेना व युवासेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. प्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, नंतर वृक्षारोपण केले. शिक्षक कॉलनीमधील सरस्वती माता मंदिराच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ६१ वेगवेगळे वृक्ष लावण्यात आले. यावेळी शहरप्रमुख बंटी जाधव, समन्वयक दतात्रय सुरोशे, युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर, अल्पसंख्याक तालुका प्रमुख ऐजाज पटेल, शहरप्रमुख नितीन बैस, नगरसेवक रमेश पराते, रमेश गायकवाड, दिलीप नंदनवार, गजानन आजेगावकर, बजरंग ठाकूर, शेख फिरोज, रमेश चिचोलकर, उतम जाधव, विशाल नरवाडे, श्याम शिराले, गजानन धोपटे, पांडुरंग कदम, बाळू कोरटवाड, अभय सोनुने, बाळा करकले, बजरंग लिगमपले, सागर आरकिलवाड, बंटी फुलकोडवाड, अनिल तोडक, कांता वासमवार, सतीश उपेवाड, गजानन लाडगे, दयानंद महाजन, जना आडेकर, राजू होले आदी उपस्थित होते.
280721\img_20210727_105338.jpg
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ढाणकी येथे वृक्षारोपण.