यवतमाळात आयोजन : ६७ वर्षानंतरही प्रश्न कायमचयवतमाळ : राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे चौैथे अधिवेशन यवतमाळात आयोजित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरला समता मैदानावर (पोष्टल मैदान) हे अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.आदिवासी बांधवांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचे ठरले आहे. आदिवासींच्या हितासाठी असलेली ५ वी आणि ६ वी सुची तयार करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यामुळे स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नावर मात करण्यासोबतच महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढील रुपरेषा ठरविण्यात येईल. या परिषदेला राज्यभरातून आदिवासी नेते, तज्ज्ञ, विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके करणार आहेत. राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत. पत्रपरिषदेला राज्याध्यक्ष घनशाम अलामे, जिल्हाध्यक्ष राजू मडावी, बामसेबचे जिल्हाध्यक्ष पी.एल.कुमरे, कृष्णा किनाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
आदिवासींचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन
By admin | Published: November 14, 2015 2:43 AM