शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

अधिवेशनात गुंजणार आदिवासींचे प्रश्न; ७ डिसेंबरला महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 12:47 PM

Yawatmal news aadivasi आदिवासींच्या प्रश्नांवर सतत दुर्लक्ष होत असल्याने येत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर आदिवासी संघटनांचा आवाज दणाणणार आहे. २२ संघटनांनी त्यासाठी एकजूट केली असून ७ डिसेंबरला नागपूर येथे संयुक्त महामोर्चा काढला जाणार आहे.

ठळक मुद्दे राज्यातील विविध २२ संघटनांची एकजूट 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासींच्या प्रश्नांवर सतत दुर्लक्ष होत असल्याने येत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर आदिवासी संघटनांचा आवाज दणाणणार आहे. २२ संघटनांनी त्यासाठी एकजूट केली असून ७ डिसेंबरला नागपूर येथे संयुक्त महामोर्चा काढला जाणार आहे. त्यादृष्टीने विविध संघटनांनी माेर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपाचे असूनही व संघटनांनी पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विधानभवनावर महामोर्चा काढला जाणार आहे.

यात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, बिरसा क्रांती दल, आफ्रोट, बिरसा ब्रिगेड, गोंडवाणा गणतंत्र पार्टी, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य आदिवासी जंगल कामगार सहकारी संघ, आदिवासी बचाव समिती, हलबा हलबी कर्मचारी संघटना, आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी परिषद, आदिवासी महिला परिषद, परधान महासंघ, आदिवासी बचाव अभियान, आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज, उत्कर्ष संस्था, तोफ यासह अनेक संघटना सहभागी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जगदिश बहिरा प्रकरणात ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार  गैरआदिवासी कर्मचाऱ्यांना  सेवामुक्त न करता त्यांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले.  खऱ्या आदिवासींची भरती प्रक्रियाही अर्धवट आहे. याबाबत आदिवासींमध्ये संताप आहे. आता गैरआदिवासी कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण देण्यासाठी ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेत अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या अभ्यासगटालाही आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

आता अशा समस्यांना वाचा फोडण्यासाठी दिवाळीच्या दिवसात आमदार-खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. पदोन्नतीमधील आरक्षण, आदिवासींच्या रिक्त जागांचा अनुशेष तात्काळ भरण्यात याव्या, वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांच्या बिंदूनामावलीची चौकशी करणे, आदिवासी संशोधन परिषदेतील कंत्राटी भरती बंद करणे व कायम स्वरुपी भरती करणे, आदिवासी विकास विभागातील गैरव्यवहारांची चौकशी करणे, क्वेस्ट संस्था बरखास्त करणे, आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदारांची उपसमिती तत्काळ नेमणे आदी मागण्यांसाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.विविध समस्यांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे १० महिन्यांपासून वेळ मागत आहोत. परंतु, अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ च्या निर्णयाची अमलबजावणीस टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे महामोर्चा काढला जाणार आहे. - प्रा. मधुकर उईके, केंद्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन