प्रतीक्षा : अर्ध्या सत्रानंतरही विद्यार्थी वंचितयवतमाळ : अर्धे शैक्षणिक सत्र संपत आले तरी, आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशाचा तिढा सुटला नाही. दोन हजार विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेशाची प्रतीक्षा आहे. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन बिरसा ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पांढरकवडा आणि पुसद प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३० वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर केले आहे. यामधील दोन हजार विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचा शैक्षणिक प्रवास थांबण्याचा धोका वाढला आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा बिरसा ब्रिगेडने दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुडमेथे, उपाध्यक्ष गणेश आत्राम, सनी कुडमेथे, कालीराम वेट्टी, विशाल मडावी, दिनेश आडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळाला तरी त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाही. भोजनही अतिशय निकृष्ट असते. आता तर अर्धे सत्र संपूनही अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. (शहर वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश थांबले
By admin | Published: October 15, 2015 2:58 AM