लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पुलवामा (काश्मिर) येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शनिवारी वणीत फेरी काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते.टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी १०.३० वाजता ही फेरी काढण्यात आली. टिळक चौक, संभाजी चौक, गांधी चौक, टागोर चौक, डॉ.आंबेडकर चौक या मार्गाने ही फेरी निघाली. या फेरीत एसपीएम महाविद्यालय, लॉयन्स इंग्लीश मीडियम स्कूल, स्वर्णलीला हायस्कूल, सुशगंगा पॉलीटेक्नीक, नुसाबाई चोपणे शाळा, टिळक महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह शिक्षण प्रसारक मंडळ व लॉयन्स क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. फेरीनंतर टिळक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, डॉ.महेंद्र लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. शिस्तबद्ध रितीने निघालेल्या या फेरीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या युवकांनी पुष्पचक्र हाती घेतले होते. देशभक्तीपर गाण्यांच्या धून वाजविणारा बँड समोर होता. अमर जवान स्मृतिचिन्हासमोर दीप प्रज्वलन करून पुष्पचक्र वाहण्यात आले. शांततामय रितीने झालेल्या या श्रद्धांजली फेरीचे सुव्यवस्थित नियोजन सहभागी शाळा-महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाºयांनी केले. संचालन डॉ.अभिजीत अणे यांनी केले.
१० हजार विद्यार्थ्यांची शहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 10:25 PM
पुलवामा (काश्मिर) येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शनिवारी वणीत फेरी काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते.
ठळक मुद्देवणीत काढली फेरी : शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश