यवतमाळ : काश्मिरातील उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील कळंब चौकात सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक अमन निर्बाण यांच्या पुढाकारात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर पंत आदींनी फुल व हारार्पण करून तसेच मौन बाळगून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मान्यवरांनी शहिदांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अॅड. सलीम शहा, गुलाम रसूल, सदाकत अली, रोशन मेश्राम, आशिक निर्बाण, माजी सभापती मौजम कुरेशी, हाजी मेहमूद, आमदभाई, सत्तारभाई, रहेमान कुरेशी, हिसहाक कुरेशी, रहमान खिलची, बब्बूभाई चुडीवाले, आसीफ उस जमाखान, अमीन मलनस, समीर सोलंकी, अखिलभाई ड्रायव्हर, मुजफ्फरभाई, साजीद खान, शे. सुलेमान, शे. तौसिफ, अमान खान, जुनेद खान यांच्यासह कळंब चौक आॅटो युनियनचे सदस्य व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.माजी सैनिक मित्र परिवारमाजी सैनिक मित्र परिवारातर्फे येथे शहिदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी देवेंद्र जाजू, मनजित ठोंबरे, रमेश भिमर्तवार, डॉ. गिरी, गाडगेबाबा स्वच्छता समितीचे रमेश गुरनुले, धनराज किरपान, वसंतराव हिवराळे आदींनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी सैनिक विनोद आरेवार, वासुदेव पावडे, अरुण मोटके, व्ही.आर. जाधव, विवेक पांडे, राजू गुजर, ज्ञानेश्वर अभ्यंकर, प्रशांत ढोणे, प्रकाश शिरभाते, दिलीप डफले, अजय पिसाळकर, पुरुषोत्तम पावडे, उदय घोर, बी.आर. खडसे, आजनकर, पेठेकर, नेवारे, पतंजली योग समितीतर्फे दिनेश राठोड, संजय चाफले, सतीश मुकरे, विदर्भ आंदोलन समितीचे दत्ता चांदोरे, विठ्ठलराव भोंगाडे, राजेश्वर निवल, किशोर परडखे, रामदास वानखडे, रामदास सव्वालाखे, लक्ष्मणराव छत्ताणी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कळंब चौकात शहिदांना श्रद्धांजली
By admin | Published: September 24, 2016 2:40 AM