लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगच या ठिकाणी नाही. यामुळे कापूस दरातील चढउताराचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतोे. शेतकरी आता कापसाला पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. या पिकाला प्रोत्साहन देणारी मंडळी उत्पादन निघताच पसार होते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. अशा स्थितीत ठोस पर्यायी पिकांचा शोध अजूनही शेतकऱ्यांना स्वस्थ बसू देत नाही.जिल्ह्यात नऊ लाख पाच हजार हेक्टर एवढे खरिपाचे लागवड क्षेत्र आहे. पूर्वी यातील ८० टक्के भाग हा कापसाचा होता. उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले. हे क्षेत्र आता निम्यावर आले. त्यातही २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये कापसाचे क्षेत्र कमी केले. लागवड क्षेत्र घटताच कापसाच्या दरात वाढ झाली. ही वाढ शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. हंगाम संपल्यानंतर कापसाचे दर तेज झाले. यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच झाला.येणाऱ्या हंगामात कापसाचा चांगला दर लाभेल म्हणून कापसाचे क्षेत्र पुन्हा वाढण्याचे संकेत मिळाले आहे. मात्र दरात स्थिरता नसते. यामुळे निम्मे क्षेत्र इतर पिकांच्या लागवडीखाली राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोेयाबीन आणि तुरीचा समावेश आहे.पर्यायी पीक खरेदी करणारी यंत्रणाच नाही२००५ पासून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. त्यात सोयाबीनमध्ये यश मिळाले. मात्र साबुदाना, सफेद मुसळी, सुंगधी तेल, जेट्रोफा, केसरच्या नावाखाली दिलेली करडी यासारखे अनेक पिके शेतकऱ्यांनी लावली. नाविन्यपूर्ण लागवडीखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत चढले होते. दरवर्षी यात शेतकऱ्यांना वाईट अनुभव आल्याने या क्षेत्रात घसरण होेत आहे. हे क्षेत्र ११ हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. अशा पर्यायी पिकांच्या खरेदीसाठी कुठलीही यंत्रणा नाही. या क्षेत्राला संरक्षण मिळाले तरच शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोग पुढे जातील. नाविन्यपूर्ण प्रयोगातील हळद आणि रेशिम ही दोनच पिके टिकलेली आहे. इतर पिकांचे क्षेत्र मात्र शून्य झाले आहे. लागवडीच्या वेळी कंपन्या शेतकऱ्यांना आश्वासन देते. मात्र पीक काढणीला येण्याच्या सुमारास कंपन्यांचे प्रतिनिधी पसार होतात. विशेष म्हणजे, फसवणूक करणाºयांचा थांगपत्ता लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा नव्या पिकावरील विश्वास घटत आहे.हळद, रेशीम, पाषणभेदहळद, रेशीमचे प्रयोग यशस्वी झाले. त्याचे मार्केट जिल्ह्यात मिळत नाही. यामुळे शेतकरी परजिल्हा अथवा परप्रांतातच विक्री करण्यास पसंती देतात. पाषाणभेदची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे. त्याच्या उत्पादनाचा उतारा अजूनही शेतकऱ्यांना समजला नाही.
पर्यायी पिकांच्या शोधात लुटारूंची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 9:58 PM
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगच या ठिकाणी नाही. यामुळे कापूस दरातील चढउताराचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतोे. शेतकरी आता कापसाला पर्यायी पिकांच्या शोधात आहेत.
ठळक मुद्देकंपन्यांची बनवाबनवी : दरांच्या अनिश्चिततेने जिल्ह्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रात चढ-उतार