पुसद : ग्रामगीता निर्माते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ११२ जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव येथील देशमुखनगरमधील प्रार्थनास्थळी शुक्रवारी सायंकाळी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
शहर व परिसरात घरोघरी राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. गुरुदेव सेवा मंडळ तालुका शाखेच्या आवाहनानुसार यंदा घरोघरी रांगोळी, विद्युत रोषणाई व दीपप्रज्वलन करीत राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रवंदना, जयघोष आदी धार्मिक कार्यक्रम घेऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला,
गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, उपाध्यक्ष नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, सचिव ॲड. गजानन साखरे, पांडुरंग बुरकुले, प्रमोद जयस्वाल, दशरथ सूर्यवंशी, सुरेश कदम, माधव जाधव, यशवंत देशमुख, गजानन जाधव, किसनराव गरडे, नरेश ढाले, रमेश सरागे, प्रकाश कदम, साहेबराव राठोड, शरद राऊत, राजेंद्र काळबांडे, गजानन दाभाडे, वसंत काळीकर, विठ्ठलराव येवले आदींनी सहकार्य केले.