ऑनलाईन लोकमत पुसद : गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र गत चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. कपाशी पाठोपाठ तूरही धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.पुसद तालुक्यात यंदा कपाशी आणि तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. सुरुवातीला अपुºया पावसाने पिकांची वाढ खुंटली होती. त्यातून कसेबसे पीक वाचत नाही तोच गुलाबी बोंडअळीने संपूर्ण पºहाटी उद्ध्वस्त झाली. आता शेतकºयांची आशा तूर पिकावर होती. परंतु गत चार-पाच दिवसांपासून ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तूर फुलोऱ्यावर आली आहे. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. फुलांची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. तुरीवर सध्या काळ्या रंगाची अळी पडली असून पाने गुंडाळणाºया अळींचाही प्रादूर्भाव दिसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. महागड्या फवारणी करण्याची तयारी शेतकºयांची आहे. परंतु फवारणीच्या विषबाधेची धास्ती अद्यापही शेतकºयात आहे. त्यामुळे फवारणीसाठीही मजूर मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी संपूर्ण खरीप हंगाम गमावून बसत आहे.शेतकरी ज्ञानेश्वर तडसे आणि अॅड. सचिन नाईक म्हणाले, यावर्षी कमी पाऊस झाला. त्यात परतीच्या पावसाने सोयाबीन उद्ध्वस्त झाले. खरिपाची ५० टक्के पिके हातून गेली आहे. हरभरा पीक चांगले असले तरी तेही धोक्याच्या पातळीत येत आहे. आता तूर पीक किडींनी पोखरुन काढले आहे. कृषी विभागाने गावोगावी मार्गदर्शन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.ढगाळ वातावरणामुळे फुलोºयाच्या स्थितीत तूर पिकांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. फुल गळती होऊन अळ्या आणि किडींचा प्रादूर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी पीक संरक्षणासाठी योग्य प्रमाणात व सुरक्षितरीत्या औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे.- प्रा. गोविंद फुकेकृषी तज्ज्ञ, पुसद.
ढगाळ वातावरणाने तूर पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:30 PM
गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केल्यानंतर शेतकऱ्यांची आशा तूर पिकावर होती. मात्र गत चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे.
ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : किडीचा प्रादुर्भाव, उत्पन्न घटणार