लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक कंपनी वॉलमार्ट आणि भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांच्यात करार झाल्याने भारतातील चिल्लर व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यापाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांचा प्रश्न सरकार दरबारी मांडला जाईल, असे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले.दि कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूशन असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार जोतवानी, सचिव चंद्रशेखर दीक्षित आदींनी बुधवारी खासदार भावना गवळी यांची भेट घेतली. वॉलमार्ट ही जागतिकस्तरावर रिटेल व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीने भारतातील फ्लिपकार्टसोबत करार केल्याने व्यापारावर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे या विषयात हस्तक्षेप करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी खासदारांकडे केली. जगातील अमेरिकेसह अनेक देशात व्यापारी कर्जाचा दर दीड ते अडीच टक्के आहे. भारतात मात्र हा दर १२ ते २० टक्क्यांपर्यंत जातो. या परिस्थितीत सरकार रिटेल क्षेत्रातही विदेशी गुंतवणुकीला परवानगी देत आहे. अशा धोरणामुळे भारतातील चिल्लर व्यापार संपुष्टात येईल. सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, असे जोतवानी यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, शहर प्रमुख नितीन बांगर, चंद्रशेखर दीक्षित, महेश मुंधडा, भाविन मजेठिया, आशु आस्वानी, जय बठेजा आदी उपस्थित होते.
किरकोळ व्यापारी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:02 PM
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक कंपनी वॉलमार्ट आणि भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांच्यात करार झाल्याने भारतातील चिल्लर व्यवसाय संपुष्टात येण्याची भीती व्यापाऱ्यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांचा प्रश्न सरकार दरबारी मांडला जाईल, असे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले.दि कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूशन असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार जोतवानी, सचिव चंद्रशेखर दीक्षित ...
ठळक मुद्देखासदारांकडे व्यथा : दोन कंपन्यातील कराराने व्यवसाय धोक्यात