लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निरागस मुलांच्या गोतावळ्यावर माया करीत जिल्ह्याच्या कानाकोपºयात काम करणाऱ्या शिक्षकांवर अनेकदा टीका होते. पण खेड्यापाड्यात नवनवे तंत्रज्ञान वापरत अध्यापन करणाऱ्या या गुरुजींच्या अंत:करणात अनेक सर्जनशील उपक्रमही जन्म घेत असतात. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अशाच उपक्रमांची दोन दिवस यवतमाळात जत्रा भरली आहे.जिल्हास्तरीय शिक्षणाच्या वारीच्या निमित्ताने खेड्यापाड्यातील गुणवत्ता शहराच्या पटलावर झळकली आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट), जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही वारी भरविण्यात आली आहे.दोन दिवसीय शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन शुक्रवारी डायटच्या प्रांगणात पार पडले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, बांधकाम सभापती नीमिष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, सीईओ जलज शर्मा, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकुटी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रशांत गावंडे, वारीचे मुख्य संयोजक मधुकर काठोळे आदी मान्यवर उपस्थित होते.वारीमध्ये शैक्षणिक उपक्रमांची एकंदर २५ दालने आहेत. इंग्रजी, गणित, ज्ञानरचनावाद, विज्ञानाचे प्रयोग, तंत्रस्नेही शाळा, स्काईपीचा डेमो, समावेशित शिक्षण, बाहुली नाट्य, संख्याज्ञान आदी शैक्षणिक दालनांसह व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान अशा सामाजिक विषयांचेही दालन येथे आहे. यात सुधाकर वांढरे, वैशाली हजारे, राजेश उरकुडे, वसंत शेळके, रविश गवई, प्रवीण देवकते, महादेव निमकर, अरविंद झळके, संजय चुनारकर, अवधूत वानखडे, सतीश बोरखडे, ओंकार राठोड, संजय तुरक, मंगला कोडापे, महेंद्र कोल्हे आदी शिक्षकांनी ही दालने लावली आहेत. तर वर्ध्याचे शरद ढगे आणि अमरावतीच्या दीपाली बाभूळकर यांचाही यात समावेश आहे.
शिक्षणाच्या वारीत उपक्रमांची चंगळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 10:11 PM
निरागस मुलांच्या गोतावळ्यावर माया करीत जिल्ह्याच्या कानाकोपºयात काम करणाऱ्या शिक्षकांवर अनेकदा टीका होते. पण खेड्यापाड्यात नवनवे तंत्रज्ञान वापरत अध्यापन करणाºया या गुरुजींच्या अंत:करणात अनेक सर्जनशील उपक्रमही जन्म घेत असतात.
ठळक मुद्देव्यावसायिक विकास संस्था : शिक्षक, विद्यार्थी, पालकांची विविध स्टॉल्सवर गर्दी