शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम

By रूपेश उत्तरवार | Published: January 20, 2024 11:57 AM

यवतमाळच्या सोनालीने बनविला रामचंद्राचा पोषाख

यवतमाळ : अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला परिधान केला जाणारा कपडा १२ लाख ३६ हजार २०० भाविकांनी हातमागावर बनविला आहे. रेशमापासून १३ दिवसांत हे कापड तयार झाले आहे. पुण्यात हे महाकापड सात रंगांचे बनविण्यात आले. विशेष म्हणजे या कापडावरून यवतमाळातील सोनाली खेडेकर या डिझायनरने ९ कारागिरांच्या मदतीने पुण्यात पोषाख तयार केला असून हे वस्त्र १६ जानेवारीला श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे सुपूर्द करण्यात आले.

यवतमाळमधील सेवानिवृत्त कृषी अधिकारी गिरीधर नागपुरे आणि प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ सदस्या पुष्पा नागपुरे यांची कन्या सोनाली खेडेकर यांचे पुण्यामध्ये बुटीक आहे. साडेबारा लाख लोकांनी मिळून हातमागावर  बनविलेले कापड पुण्यातील अनघा घैसास यांनी सोनाली खेडेकर यांना दिले.

रासायनिक रंग नाही, असा आहे पाेषाखसोनाली यांनी त्यांच्याकडील नऊ कारागिरांच्या मदतीने प्रभू रामचंद्रासाठी अंगरखा, उपरणे आणि धोती असा पोषाख तयार केला.विशेष म्हणजे, या पोषाखावर एम्ब्रॉयडरी, काशिदाकरी, मोतीकाम आणि इतर कलाकुसर साकारण्यात आली आहे.वेगवेगळ्या प्रकारचे सात पोषाख बनविण्यात आले आहेत. भगवा, केशरी, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा हे रंग वापरून ऋग्वेदातील शास्त्रानुसार हे महावस्त्र तयार केले आहे. त्यात कुठलाही केमिकल रंग नाही.

श्रीराम जन्मभूमी न्यास कार्यालयाने महावस्त्र बनविण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. त्यावर आम्ही दीड वर्षापासून काम करीत आहोत.  मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना हा पोशाख सुपुर्द करण्यात आला. - अनघा घैसास,सौदामिनी हँडलुम संचालिका, पुणे

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याYavatmalयवतमाळ