लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूरवरून हैदराबाद येथे गोवंशाचे मांस ट्रकमधून जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून शहरालगतच्या किन्ही परिसरात ट्रक ताब्यात घेण्यात आला. यामध्ये दोन हजार ३६२ किलो गोवंश मांस प्लास्टिक बॉक्समध्ये आढळून आले. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.बुधवारी मध्यरात्री ट्रकमधून (एमएच ३२ जी २३६२) गोवंश मांस हैदराबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा ट्रक पास करण्यासाठी कार (एमएच ४० एसी २४३५) पायलटिंग करत होती. गोपनीय माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी आर्णी मार्गावर सापळा लावला. मध्यरात्री पायलटिंग करणारी कार ताब्यात घेतली. नंतर मागून आलेला ट्रकही ताब्यात घेतला. आरोपी नदीम खान सलीम खान (२८) रा. शिवशक्तीनगर, कामठी रोड नागपूर (ट्रकचालक), इब्राहीम खान मजीद खान (६१) रा. हमीदनगर नागपूर (गोवंश मांस तस्कर), असलम शाह अब्दुल शाह (२५) रा.आदर्शनगर पांढरकवडा रोड हा कारमधून ट्रककरिता पेट्रोलिंग करीत होता. या तिघांना पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मनदेव घाटात पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. या मुद्देमालाची किंमत १५ लाख ९७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई ग्रामीणचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात फौजदार संजय शिंदे, सचिन घुगे, जयंत ब्राह्मणकर, सुनील दुबे यांनी केली. यापूर्वी या पथकाने कत्तलीला जाणाऱ्या जनावरांची दोन ट्रकमधून सुटका केली होती. गोवंश मांस नेणाºया आरोपींना ग्रामीण पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी कलम २७९, ३४ व सहकलम ५ नुसार गुन्हा दाखल आहे.
अडीच हजार किलो गोवंश मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 10:31 PM
नागपूरवरून हैदराबाद येथे गोवंशाचे मांस ट्रकमधून जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. यावरून सापळा रचून शहरालगतच्या किन्ही परिसरात ट्रक ताब्यात घेण्यात आला. यामध्ये दोन हजार ३६२ किलो गोवंश मांस प्लास्टिक बॉक्समध्ये आढळून आले.
ठळक मुद्देतिघांना अटक : मनदेव घाटात ग्रामीण पोलिसांची कारवाई