लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील पाच आराेपीपैकी तिघांना पाेलिसांनी १२ तासात अटक केली. मात्र यातील दाेघे पसार झाले, त्यांचा शाेध सुरू हाेता. या आराेपींनी साेमवारी महिनाभरानंतर पाेलिसांनी अटक केली. प्रफुल गजबे, हर्षल चचाणे रा. माळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे दाेघेही अनेक दिवसांपासून पाेलिसांना चकमा देत हाेते. त्याचे लाेकेशन काढून हर्षल चचाणे याला अमरावती येथून ताब्यात घेतले. तर प्रफुल गजबे याला यवतमाळात अटक केली. या आराेपींचा प्रवीण कवडुजी केराम रा. तलावफैल याच्यासाेबत वाद झाला हाेता. प्रवीण हा अक्षय राठाेड टाेळीचा सक्रिय सदस्य हाेता. त्याच्यावर करण पराेपटे याच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. प्रवीण आपला गेम करेल या भीतीतून त्याची संगनमताने हत्या करण्यात आली. ६ ऑक्टाेबरच्या रात्री त्याच्यावर दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन आराेपी साहिल संजय रामटेके, वेदांत मानकर, निखिल उर्फ पीजी, प्रफल गजबे, हर्षल चचाणे यांनी हल्ला केला. यातील तिघांना तत्काळ अटक केली. पसार असलेल्या गजबे व चचाणे याला साेमवारी अटक केली. ही कारवाई शहर पाेलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक जनार्धन खंडेराव, रवी नेवारे, अंकुश फेंडर, सुनील पैठणे यांनी केली.
जाब विचारणाऱ्याला केले जखमी - यवतमाळ : मुलाला मारहाण का करता असा जाब विचारणाऱ्या महिलेला आरोपींनी मारहाण केली. ही घटना उमरखेड शहरातील चोखामेळा वाॅर्डात घडली. प्रयागबाई विकास लांबटिळे यांच्या तक्रारीवरून आरोपी सोनू उर्फ मुन्ना लहू सोनटक्के विरोधात उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. शहरात गांजाची सहज उपलब्धता होत आहे. नशेच्या आहारी गेलेल्यांकडून शरीर दुखापतीचे गुन्हे केले जात आहे.