यवतमाळ : येथील संकटमोचन परिसरातील अमित पलटनकर खून प्रकरणात पसार दोन आरोपींना टोळी विरोधी पथकाने वर्धा येथे बुधवारी रात्री अटक केली. नाना उर्फ प्रथमेश रोडे (२७), मयुर उर्फ चिनी पुसनाके (२१) दोघे रा. संकटमोचन, उमरसरा असे अटकेतील आरोपींची नावे आहे. खुनाच्या घटनेपासून हे दोनही आरोपी पसार होते. खून झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात वडगाव पोलिसांंना यश आले. मात्र या घटनेतील मुख्य सूत्रधार पसार असल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. आरोपी वर्धा येथे दडून असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने बुधवारी रात्री वर्धा गाठून दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून आता गुन्ह्यात वापरलेले हत्यार व इतर मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघन, अमोल चौधरी, विनोद राठोड आदींनी केली. या खुनातील दोनही आरोपींना गुरुवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात आली. कोठडीत या खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पलटनकरच्या खुनातील दोघांना अटक
By admin | Published: August 26, 2016 2:24 AM