शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दोन दिवसांपासून रिमझीम पाऊस

By admin | Published: July 22, 2014 12:05 AM

पुसद तालुक्यात शनिवार व रविवार या दोन दिवसात रिमझीम पाऊस सुरू असून ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद असून

पुसद : पुसद तालुक्यात शनिवार व रविवार या दोन दिवसात रिमझीम पाऊस सुरू असून ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी. पावसाची नोंद असून यंदा मागील १० वर्षातील सरासरीपेक्षा सर्वात कमी पाऊस कोसळला आहे. मागील वर्षी २१ जुलैपर्यंत तब्बल ४०० मिमी पाऊस कोसळला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कायम असून अद्यापही दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हवामान खात्याचे अंदाज चुकवून पाऊस गायब झाला. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू आदी पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने यंदा बळीराजा हवालदिल झाला. त्यातच १४ जून व ८ जुलै रोजी तालुक्यात पाऊस कोसळला. आता पाऊस येईलच या भाबड्या आशेने काही शेतकऱ्यांनी उडीद, मूग व सोयाबीनची पेरणी केली. मात्र पेरलेले ५० टक्के बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर उडीद, मुगाचा हंगाम निघून गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची मोठ्या हिमतीने पेरणी केली. मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. मात्र आता १९ व २० जुलै या दोन दिवसांपासून तालुक्यात सार्वत्रिक रिमझीम पाऊस बरसत आहे. सगळीकडे ढगाळ वातावरण पसरले असून वातावरणात गारवा वाढला आहे. १९ जुलै रोजी सात तर २० जुलै रोजी चार मिमी असे एकूण ११ मिमी पावसाची नोंद तहसील कार्यालयाने केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ५४ मिमी पाऊस कोसळला असून मागील वर्षी २१ जुलैपर्यंत तब्बल ४०० मिमी पाऊस कोसळला होता, हे विशेष. यंदा सरासरीपेक्षा केवळ ५४ मिमी पाऊस कोसळण्याची ही मागील १० वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)