ढाणकी : निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने येथील दोन नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. रमेश लक्ष्मण पराते व मंदाकिनी दिलीप नंदनवार, अशी या दोन नगरसेवकाची नावे आहे. पराते हे प्रभाग क्र. १३ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून, तर मंदाकिनी दिलीप नंदनवार ह्या प्रभाग क्र. १२ मधून अनुसूचित जमाती महिला राखीव प्रवर्गातून शिवसेना उमेदवार म्हणून विजयी झाल्या होत्या.
त्यांनी निवडणूक आयोगाला निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमीपत्र दिले होते. मात्र, दोन्ही नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. पराते यांनी अनुसूचित जमाती या प्रवर्गातील हलबी जातीची पडताळणी करावी, असा विनंती अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांचा दावा अवैध ठरविला. जात पडताळणी समितीनेही उपविभागीय अधिकाऱ्यांनी रमेश पराते व मंदाकिनी नंदनवार यांना दिलेला हलबी या अनुसूचित जातीचा दाखला रद्द केला आहे.
बॉक्स
न्यायालयात अपिल दाखल करणार
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या अपात्रतेच्या कारवाईची प्रत मिळाल्याचे रमेश पराते यांनी सांगितले. त्या विरोधात नागपूर खंडपीठात आपले वकील अपिल दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
300721\1627645506101_1627645493614_1627644871592_1627644850464_nagarsevak.jpg
ढाणकी न.प.चे दोन नगरसेवक अपात्र.
मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे पडले महागात.