शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

दोन गटात तुफान हाणामारी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 5:47 PM

जुन्या वादातून लाठ्या व काठ्या चालल्या

आर्णी (यवतमाळ) : एका महिलेला अपशब्द बोलल्याने तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देऊरवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ६:३०च्या सुमारास इंगळे व माघाडे या दोन गटात जुन्या वादातून लाठ्या व काठ्या चालल्या. यात माघाडे कुटुंबातील चार भावांनी शेजारी राहणाऱ्या इंगळे कुटुंबातील महिला, पुरुषांना घरात शिरून मारहाण केली. यात इंगळे कुटुंबातील बाबाराव माणिक इंगळे, शालिक गणपत इंगळे, कमला माणिक इंगळे, दत्ता माणिक इंगळे, संतोष शालिक इंगळे, अर्चना संतोष इंगळे, रामेश्वर शंकर शिंदे, गजानन सखाराम इंगळे हे आठजण जखमी झाले.

जखमींना गावकऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरा याप्रकरणी हिंमत सखाराम इंगळे (३०) यांनी तक्रार दिली. त्यावरून गोपाल मोतीराम माघाडे (३१), संतोष मोतीराम माघाडे (२६), गणेश मोतीराम माघाडे (२५), राहुल मोतीराम माघाडे (३०) या चौघांविरुद्ध संगनमत करून घरात शिरून जीवे मारण्याच्या उद्देशाने महिला व पुरुषांना मारहाण केल्यावरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपी माघाडे यांनी वापरलेल्या दुचाकी घटनास्थळावरून रात्री ताब्यात घेतल्या आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक किशोर खंडार करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी झाला होता वाद

घटनेच्या दोन दिवसांपूर्वी बाबाराव इंगळे यांच्यासोबत गोपाल माघाडे याचा वाद झाला होता. बाबाराव यांची पत्नी सविता इंगळे यांच्याबद्दल गोपाल माघाडे याने अपशब्द वापरले होते. त्यावरून त्यादिवशी भांडणही झाले होते. दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रारसुद्धा दिली होती. तेव्हापासूनच त्यांचे खटके उडत होते. यातूनच शुक्रवारी हाणामारी झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ