शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

By अविनाश साबापुरे | Published: May 07, 2023 9:12 PM

११ केंद्रांवर सुरळीत पार पडली परीक्षा

यवतमाळ : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘नीट’ परीक्षा रविवारी शहरात पार पडली. यावेळी एका परीक्षा केंद्रावर चक्क दोन बनावट परीक्षार्थी आढळले. याबाबत प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नीट परीक्षेला गेल्या काही वर्षापासून वलय प्राप्त झाले आहे. त्यामुळेच ही परीक्षा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खासगी क्लासेस लावले जात आहेत. आता तर चक्क नकली परीक्षार्थीच परीक्षा केंद्रावर पाठविण्याचा गंभीर प्रकार यवतमाळात पुढे आला आहे. त्यामुळे प्रशासनही हादरले आहे. दरम्यान शहरातील ११ केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील ३ हजार ३६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. रविवारी प्रत्यक्षात ३ हजार ३२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.

परीक्षेचे शहर समन्वयक म्हणून प्राचार्य प्रफुल्ल चपाते यांनी काम सांभाळले. परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डाॅ. पवन बन्सोड यांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले. ही परीक्षा यवतमाळातील जेडीआयईटी, ॲंग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ पब्लीक स्कूल, सेंट अलाॅयसिअस, स्कूल ऑफ स्काॅलर्स, जायन्टस् स्कूल, जवाहरलाल दर्डा इंग्लीश मिडियम स्कूल, विद्या भवन काॅलेज ऑफ मॅनेजमेंट ॲंड रिसर्च, आबासाहेब पारवेकर काॅलेज, महर्षी विद्या मंदिर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या अकरा केंद्रांवर दुपारी २ ते ५ या वेळात घेण्यात आली.

दरम्यान, फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांनी विद्यार्थ्यांना प्रचंड घाम फोडला. क्लासमध्ये घेण्यात येणाऱ्या टेस्टपेक्षाही कठीण प्रश्न परीक्षेत होते. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांवर एकूण ७२० प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजीचे ३६० तर फिजिक्स व केमिस्ट्री या विषयावर आधारित प्रत्येकी १८० प्रश्न होते. या प्रश्नांची सोडवणूक करताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली. तुलनेत बायोलॉजीचे प्रश्न तितके अवघड नव्हते, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी पाहायला मिळाली. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट म्हणजेच ‘नीट’ परीक्षा देणे बंधनकारक आहे. 

मागील वर्षी ‘कॅफे’ चालकाने फसविले गेल्या वर्षी झालेल्या नीट परीक्षेत काही विद्यार्थिनींना एका सायबर कॅफे चालकाने फसविले होते. त्यांचा बनावट परीक्षा अर्ज कॅफे चालकाने भरला होता. विशेष म्हणजे या विद्यार्थिनींना त्याने बनावट हाॅल तिकिटही दिले. प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर मात्र या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच परत जावे लागले.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालYavatmalयवतमाळ