शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

घाटंजीतील दोन ज्वेलर्स फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:55 PM

शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली.

ठळक मुद्देचोरट्यांचा हैदोस : सीसीटीव्ही कॅमेरे फोडून ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली.१९ डिसेंबरच्या रात्रीपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. स्थानिक पोलिसांचे कोणतेच नियंत्रण दिसत नाही. बुधवारी रात्री ईस्तारीनगर येथील अनंत राऊत यांचे घरफोडून १९ हजाराचे दागिने चोरून नेले. त्यानंतर २० डिसेंबरच्या रात्री गणेश कवडू राठोड यांची एमएच २९- बीसी-३१७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. येथून चोरट्यांनी बाजारपेठेतील हर्षे यांचे ज्वेलर्सचे दुकान फोडून एक लाख ५९ हजाराचे दागिने व रोख १० हजार रूपये असा एक लाख ६९ हजाराचा मुद्देमाल चोरी गेला. येथून चोरट्यांनी बाजुच्याच शुभम ज्वेलर्सकडे मोर्चा वळविला, दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र दागिने ठेवून असलेली तिजोरी न उघडल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. चोरट्यांनी दुकाने फोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतल्याचे दिसून येते. त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. केवळ एका ठिकाणी चोरटे दुचाकीवरून येताना दिसतात. चोरट्यांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आले नाही. एलसीबीचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार असलम खान यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पोपुलवार तपास करत आहे.

टॅग्स :Thiefचोर