लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात नगरपरिषदेच्या पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. आठ दिवसात मास्क न वापरणाºयांकडून एक लाख ८८ हजारांचा दंड वसूल केला आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी काही सक्तीचे नियम करण्यात आले आहे. याचे पालन न करणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. १८ ते २५ एप्रिलदरम्यान झालेल्या कारवाईत ही दंडाची रक्कम वसूल केली आहे.नगरपरिषदेच्या पथकाने आर्णी रोड, वडगाव रोड, जांब रोड, उमरसरा, मुलकी, गोदणी रोड, बाजोरियानगर, लोखंडी पूल, कॉटन मार्केट, मारवाडी चौक, पिंपळगाव, मोहा, जामडोह, गिरीजानगर, चांदोरेनगर, सूरज नगर, एलआयसी चौक, स्टेट बँक चौक, संदीप टॉकीज परिसर यासह विविध भागात फिरून कारवाईची मोहीम राबविली.नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये, प्रत्येकांनी तोंडावर मास्क वापरावा, घराबाहेर पडल्यानंतरही अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासह काही नियम कोरोनाविषाणू संसर्ग थांबविण्यासाठी सक्तीचे करण्यात आले आहे. ज्या नागरिकांकडून या नियमांचे पालन केले जात नाही त्यांना नगरपरिषदेचे पथक गाठून त्यांना जागेवर दंड ठोठावत आहे. २०० ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचे अधिकार या पथकाला बहाल करण्यात आले आहे. मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या निर्देशावरून ही कारवाई केली जात आहे.शहरातील काही दुकानांमध्ये दर्शनी भागात मालाचे दरपत्रक लावलेले आढळून आलेले नाही. अशा दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाºयांकडूनही दंड वसूल करण्याचे काम पालिकेचे पथक करत आहे. या पथकामध्ये आरोग्य निरीक्षक राहूल पळसकर, अभियंता गजानन वातीले, अभियंता निखिल पुराणिक, कर्मचारी बंडू कुमरे, सहदेव पाली, राहुल राऊत, हरणखेडे, अतुल चिल्लरवार यांचा समावेश आहे. शहर ठाणेदार धनंजय सायरे, अवधूतवाडी ठाणेदार आनंद वागतकर, लोहारा ठाणेदार सचिन लुले यांच्याकडून बंदोबस्त पुरविण्यात येत आहे.दरफलकाची सक्तीशहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांपुढे दरफलक दर्शनी भागावर लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. असे फलक न दिसल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. अचानक पथक धडकत असल्याने अनेकांनी धास्ती घेतली आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांना दोन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:00 AM
नगरपरिषदेच्या पथकाने आर्णी रोड, वडगाव रोड, जांब रोड, उमरसरा, मुलकी, गोदणी रोड, बाजोरियानगर, लोखंडी पूल, कॉटन मार्केट, मारवाडी चौक, पिंपळगाव, मोहा, जामडोह, गिरीजानगर, चांदोरेनगर, सूरज नगर, एलआयसी चौक, स्टेट बँक चौक, संदीप टॉकीज परिसर यासह विविध भागात फिरून कारवाईची मोहीम राबविली.
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेची कारवाई : विनाकारण बाहेर पडणाऱ्यांनाही दणका